Sunday, September 27, 2026
Homeऔरंगाबादअंजना नदीवरील फुलाच्या वादातून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप

अंजना नदीवरील फुलाच्या वादातून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप

अंजना नदीवरील फुलाच्या वादातून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शफेपूर येथील कृष्णा विठ्ठल मोकासे (वय ६५) यांनी २२ जुलै रोजी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी (२९ जुलै) पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मोकासे यांच्या निधनानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच पिशोर पोलीस ठाण्यासमोर सकाळी ९ वाजता जोरदार निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी लावून धरली. मयत शेतकऱ्याचा मुलगा हर्षल मोकासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, संबंधित ठेकेदार तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात संबंधित ठेकेदाराने मोकासे यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत ते मागे घेण्याची स्पष्ट मागणी केली. पिशोर पोलीस ठाण्याचे एपीआय शिवाजी नागवे यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती चौकशी करून दोन-चार दिवसांत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणावग्रस्त वातावरण काहीसे निवळले. नातेवाईकांनी यावेळी पोलिसांच्या समजूतदार व समुपदेशनात्मक भूमिकेचे कौतुक केले.दुपारी ११ वाजता शफेपूर येथील स्मशानभूमीत मोकासे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.या घटनेने संपूर्ण पिशोर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांतून दोषींवर कठोर कारवाई व अंजना नदीवरील पुलाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याने आपले प्राण गमावले, असा आरोप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
Previous article
लासुर स्टेशन बस स्थानकांत नवीन बांधकामाची व प्रवासाची होणाऱ्या समस्या पाहणी बुलढाणाचे विभाग नियंत्रक यांनी केली…. आत्ताच एक्सप्रेस गंगापूर प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट, विभाग उपनियंत्रक अभियंता विनोद इलामे आले होते. दरम्यान लासुर स्टेशन बस स्थानक परिसरातील नवीन बस स्थानक बांधले जात आहे, ज्याची पाहणी करण्यासाठी आज काही अधिकारी आले होते. या पाहणीदरम्यान, त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक माहिती घेतली व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी विचारपूस केली आणि जे काही समस्या आहेत त्यांनी जाणून घेतल्या नवीन इमारतीचे बांधकामांची पाहणी केली आणि लवकरच लासूर स्टेशन येथील प्रवाशांना या नवीन बस स्थानकामुळे प्रवाशांना चांगली सोय होईल, अशी अपेक्षा आहे व्यक्त केली ‌.यावेळी बस स्थानक प्रमुख गंगाराम काळे राजू सुलाने शाकेर पठाण हसन पठाण अनिल त्रिभुवन वाहक चालक उपस्थित होते.
Next article
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments