भाऊबीज स्रीजातीला स्वतंत्र्य दर्जा मिळवून देऊ शकतो काय?
भाऊबीज स्रीजातीला स्वतंत्र्य दर्जा मिळवून देवू शकते काय? असा जर विचार केल्यास त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आजपर्यंत भाऊबीज झाल्या. बहिणीनं भावाला ओवाळलं. परंतू ना समाजप्रबोधन झालं. ना समाज पूर्ण रितीनं बदलला. प्रत्येक वेळी भाऊबीज साजरी होते. प्रत्येक मुलीला आपल्या भावाला ओवाळतांना आनंद होतो. बहिण आपली मानसिकता सोडून भावाला ओवाळतेही. कदाचित भाऊ पुढील जन्माचा संकटात सोबती होईल यासाठी.
आजपर्यंत याच उद्देशानं ह्या भाऊबीजा साज-या झाल्यात. बहिणीनं भावाला ओवाळलं. त्याच्या लांब आयुष्याची प्रार्थना केली. परंतू भावानं तिच्या भावना ओळखून आजपर्यंतच्या आयुष्यात तिच्या मागण्या कधीच पुर्ण केल्या नाहीत. तिला स्वतंत्र्य दर्जा कधीच प्रदान केला नाही किंवा तिला राजसुख दिले नाही. त्यातच तिचे वेडेवाकडे पाऊल राज्याला घातक समजून तिचा पावलोपावली छळच केला. विवाहानंतरही तिला तिच्या पतीच्या शय्येवर सती जातांना कधी तिला रोखले नाही वा जाणूनबुजून तिला सासरचे लोकं सती देत होते, तेव्हाही त्याचा त्यानं विरोध केला नाही. स्री जात…….. स्री जातीला पुर्वीपासून हिनच मानलं गेलं. तिच्या उठण्याबसण्यावर फार कडक बंधन घातली गेली. तिच्या मनाला बांधील केलं गेलं. तिनं कोणत्याही संकटाच्या समयी कितीही धैर्य दाखवलं तरी तिची किंमत झाली नाही. त्यातच तिला अर्धांगीनी न मानता तिला दोष देत तिला उपेक्षीत जीवन जगायला भाग पाडलं गेलं.
राज्यातील महत्वाचे विषय. राज्यातील महत्वाचे प्रसंग. परंतू या महत्वाच्या प्रसंगावरही स्रीयांच्या नशीबी दुःखच होतं. कोणत्याही महत्वाच्या विषयावर स्रीया कितीही हुशार असल्या तरी त्यांचे निर्णय राजा विचारात घेत नसे नव्हे तर कोणत्याही कठीण प्रसंगात राजा स्रीयांना दुय्यम स्थानच द्यायचा.युद्ध असो की अजून कोणती परीस्थीती. राजाला देव मानून प्रजा त्याच्या उलट्यासुलट्या गोष्टीवरही विश्वास ठेवत असे. त्यातच समजा कधी दुष्काळाची परीस्थीती आली तर त्या दुष्काळी परीस्थीतीसाठीही राजा स्रीयांनाच दोषी ठरवत असे.
स्वयंवराची पद्धत होती. परंतू या स्वयंवरात राजाचीच इच्छा चालत असे. स्वयंवरापुर्वी दूरदूरच्या राज्यात विवाहाचे (स्वयंवराचे) निमंत्रण पाठवले जाई. त्यातच त्या स्वयंवराला दुरदूरची मंडळी हजेरी लावत. जे हजेरी लावत. त्या राजाची आणि राज्याची माहिती राजा आपल्या सुमंताकरवी वा भाटाकरवी प्राप्त करीत असत. त्यातच ती माहिती प्राप्त होताच राजा आपल्या मुलींसोबत आपल्या चर्चा करीत असे आणि बजावून सांगत असे की तिनं कोणाच्या गळ्यात वरमाला घालावी वा कोण तिच्या लायक आहे. त्यानंतर स्वयंवर होत असे. स्वयंवरात पैजा लागत असत. त्यातच जो राजा या स्वयंवरात पैज जिंकला. त्याच्या गळ्यात ती राजकन्या वरमाला टाकून विवाह करीत असे.
विवाह करतांना स्वयंवरात राजानं बजावून सांगीतल्यामुळे विवाह तो राजा पैज जरी जिंकला असला तरी राजकन्या करीत नसत. उदाहरण द्यायचं झालं तर कर्णाचं देता येईल. कर्ण हा सुतपुत्र जरी नसला तरी त्याचा परीचय केवळ अधिरथाच्या घरी तो वाढत असल्यानं व त्याची कल्पना खुद्द द्रोपदीला असल्यानं तो जरी स्वयंवराची पैज जिंकला असला तरी त्याच्याशी स्वयंवर जिंकल्यावरही द्रोपदीनं विवाह केला नाही. त्याच्याशी विवाह वृषालीला करावा लागला. तसेच दुर्योधनानं स्वयंवराची पैज जिंकली असतांनाही भानुप्रियानं नकार दिला होता. परंतू दुर्योधनानं बलाचा वापर करुन जबरदस्तीनं तिच्याशी विवाह केला. त्यातच आपल्या प्रिय भावासाठी भिष्मानंही स्वयंवर जिंकला आणि इच्छा असतांनाही अंबा, अंबिका अंंबालिकांना भिष्माशी विवाह करता आला नाही.
मुळात स्री इच्छा विवाहप्रसंगी चालत नव्हतीच. रुख्मीनीलाही विवाह करतांना पळून जावं लागलं. त्यातच विवाहयोग्य वर निवडतांना आपल्या भावाचा रोष पत्करावा लागला होता. त्यातच शुभद्रेला आपल्या भावाच्या मदतीनं पळून जावं लागलं.
संपत्तीचाही अधिकार स्रीयांना पुर्वीपासूनच नव्हता. तिनं कमावलेलं स्री धन हे तिचं न राहता ते पुरुषांचंच असायचं नव्हे तर तिच्या धनावर पुरुषांचाच हक्क असायचा. ती आपलं धन स्वतःवर पुरुषांच्या परवानगीशिवाय खर्च करु शकत नव्हती. हे स्रीधन मग तो पुरुष पिता असेल तर पित्याच्या स्वाधीन करीत असे. तो जर पती असेल तर पतीच्या आणि तो जर पुत्र असेल तर पुत्राच्या.
स्री जन्माबाबतही समाजात उदासीनता होती. जर स्रीयांनी स्री भ्रृणांना जन्म दिला तर दुषणे लावली जायची. त्यातच स्री भ्रृणांना निसर्गतः नष्ट करण्याचं कार्यही याच संस्कृतीनं पुर्वीपासून केलं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसेच हा भ्रृण जन्मास आलाच आणि पुढं राज्यावर कोणतं संकट आल्यास त्याला जबाबदार याच स्री भ्रृणालाच पकडल्या जात असे. त्या स्री भ्रृणाच्या जन्माचा काहीही दोष नसतांनाही. असा दोष दिसलाच तर त्या स्रीयांना मग त्या सख्ख्या मुली का असेना राजा त्यांना दुःख न बाळगता दुस-यांना दान म्हणून देवून टाकत असे वा ठार करुन टाकत असे. स्रीयांना बोलण्याचा पाहिजे त्या प्रमाणात अधिकार नव्हता.
स्रीयांना आपल्या परीवारात काम करतांनाही मनाईच होती. तिला पुरुषांच्याच मर्जीनं काम करावं लागत असे. तिच्या मर्जीनं कामं करायला मनाई होती. जर तिनं पुरुषांच्या मर्जीनं कामं केली नाहीत, तर तिला जबर शिक्षा होई. त्यातच तिचे अवयव कापण्याचीही शिक्षा होत असे. तिचा दोष पाहिजे त्या प्रमाणात नसतांनाही.
स्रीयांना पुरुष मृत्यूवेळीही सोडलेले नव्हते. समजा पुरुष असलेल्या तिच्या पतीचा मृत्यू झालाच तर तिलाही त्या पुरुषांसोबत सती देण्याची पद्धत होती. त्यातच तिची इच्छा असो वा नसो. अशा कितीतरी स्रीया काळानं पुरुष निधनानंतर हिरावल्या होत्या.
रजस्वला स्रीयांना मंदिरप्रवेश नव्हताच. समजा अशी स्री एखाद्या वेळी मंदिरात गेली आणि ते जर कोणाला माहित झाले तर त्या स्रीयांना फासावरच देण्याची पद्धती होती.
हा झाला पुर्वीचा काळ. आजही काळ बदलला नाही. काळ बदलू पाहात आहे. परंतू आजचीही पुर्वीची मानसिकता त्या काळाला बदलू देत नाही. आजही स्रीयांना त्या रजस्वला असतांना स्रीयांना मंदिरात जाता येत नाही. आजही स्री जन्माचा विटाळच मानला जातो. आजही स्रीयांच्या भ्रृणांना नष्ट केलं जातं. आजही स्रीयांचे विवाह पुरुष मर्जीनंच होतात. अन् आजही स्रीयांच्या संपत्तीवर पुरुषच हक्क गाजवतात. तिला तिचंच वेतन खर्च करता येत नाही स्वतःवर. मात्र एक बदल झाला, तो म्हणजे सतीप्रथेचा. आज सतीप्रथा अस्तित्वात नाही. परंतू ती प्रथा जरी आज अस्तित्वात नसली तरी आज पतीनिधनानंतर स्रीयांचं सौंदर्य नष्ट केलं जातं. भांगावरचं कुंकू पुसलं जातं. बांगड्या फोडल्या जातात. एवढंच नाही तर जोडवे काढल्या जातात. त्यातच आज पांढ-या साड्यांची पद्धत नसली तरी पतीनिधनानंतर तिचं सारं सौंदर्य हिरावलं जातं. ओष्ठरंग, नेलपालिश सारं नष्ट केलं जातं. ती आजही पतीनिधनानंतर काजळ, पावडर लावू शकत नाही. काजळ पावडर लावून समाजात मिरवू शकत नाही.
आज चौफेर निरीक्षण केलं आणि सर्वेक्षण केलं तर स्रीया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. तरीही सर्वेक्षणातून मुलींचीच जनन संख्या कमी असलेली दिसते. मुली का कमी झाल्या असा जर विचार केला तर ती संख्या स्री भ्रृणहत्येनं कमी झालेली आहे असं कोणीही म्हणेल. आज देशातील राज्याचे काही भाग सर्रासपणे स्री भ्रृणहत्येचे पापच करीत असलेले दिसतात.
मुळात सांगायचं झाल्यास हे स्री भ्रृणहत्येचे पाप का घडतं. स्रीयांबाबत हा हिन दृष्टिकोण अजूनही समाजात का आहे? आजही स्रीयांना आपल्या पसंतीचा जोडीदार का निवडता येत नाही? आजही अशा आंतरजातीय किंवा प्रेमविवाह करणा-या प्रेमीयुगलांचा विवाह समाज का स्विकारत नाही अन् असे विवाह समाज का मान्य करीत नाही? तसेच आजही रजस्व स्रीयांना मंदिर प्रवेश का नाही? ह्या सर्व बाबी विचार करायला लावणा-या अाहेत.
आजही स्री जन्माबाबत उदासीनताच आहे नव्हे तर उदासीनताच दिसून येते. समजा पहिल्या वेळी मुलाचा जन्म झाला तर वाढत्या लोकसंख्येनुसार नसबंदी करुन संख्यावाढीवर नियंत्रण आणलं जातं. परंतू जर पहिले अपत्य मुलगी जर असेल तर नसबंदी केली जात नाही. दुसरं मुल होईपर्यंत वाट पाहिली जाते. दुसरं अपत्य जर मुलगीच झाली तर वाढती महागाई व लोकसंख्यावाढ लक्षात घेता मनात इच्छा नसतांना नसबंदी केली जाते. हीच मानसिकता आज समाजाची होवून बसलेली आहे. मुलगी प्रगतीचा आधार नाही तर मुलगाच प्रगतीचा आधार आहे.मुलगी वंशवेल वाढवीत नाही तर मुलगाच वंशवेल वाढवतो हीच समाजाची मानसिकता……. पण बाबांनो, मुलगीच जर एखाद्या मुलाला पत्नी म्हणून मिळाली नाही तर वंशवेल तरी वाढेल का? याचं उत्तर नाही असंच आहे.
आज पुरुषी मानसिकता बदलविण्याची गरज आहे. ती बदलणार कशी? त्या मानसिकतेला कायदेही बदलवू शकत नाहीत. समाजप्रबोधनही बदलवू शकत नाही. मग ती बदलणार कशी? हा एक यक्षप्रश्न आजही विचारवंतांपुढं उभा आहे. आज हीच मानसिकता बदलायला हवी. तेव्हाच स्री जातीचा उद्धार होईल. पुरुषांना जसा जीवन जगण्याचा अधिकार आहे. तसाच अधिकार हा स्रीजातीलाही आहे. हा विचार पुरुष जातीनं आज अंगीकारण्याची गरज आहे. जेव्हा संपूर्ण पुरुषजात प्रत्येक पुरुषांसह तो विचार अंगीकारेल, तेव्हाच समाज सुधारेल. षुरुष मानसिकताही बदलेल व स्रीयांचा दर्जा सुधारेल. मग प्रत्येक स्रीजातीला ती स्वतः स्वतंत्र्य असल्याचा अनुभव येईल नव्हे तर तिला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वाटेल.
आज ज्याप्रमाणं प्रत्येक पुरुषाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तशीच गरज आहे प्रत्येक पुरुष असलेल्या भावाची मानसिकता बदलणं. आज अशा प्रत्येक भावाची मानसिकता प्रत्येक स्री असलेल्या बहिणीबाबत बदलल्यास नव्हे तर प्रत्येक स्रीजातीबाबत बदलल्यास समाज परिवर्तन होवू शकते. स्रीबाबत विचार करण्याचा दृष्टिकोण बदलेल. स्रीयांनाही पुरुषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळतील व हे जेव्हा घडेल, तेव्हाच ती खरी बहिणीला ओवाळणी असेल यात दुमत नाही.
-अंकुश शिंगाडे