Homeऔरंगाबादनादरपुर येथे जन्मदात्या वडिलांची रक्षा नदीत व इतर कुठे न टाकता खड्डा...

नादरपुर येथे जन्मदात्या वडिलांची रक्षा नदीत व इतर कुठे न टाकता खड्डा खोदून शेतावरच पर्यावरण झाड लावले

नादरपुर येथे जन्मदात्या वडिलांची रक्षा नदीत व इतर कुठे न टाकता खड्डा खोदून शेतावरच पर्यावरण झाड लावले 

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील जन्मदात्या वडिलांची आठवण कायमस्वरूपी स्मरणात रहावी म्हणून वडीलांची रक्षा नदी किंवा इतरत्र कोठे टाकून प्रदूषण न करता भाऊ व पुतण्याने शेतावरच अंत्यविधीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला.नादरपुर येथील जयाजी पुडलिक निकम यांचे सोमवारी वृद्धापकाळात निधन झाले. निकम कुटुंबियांनी आपल्या काकाचे अंत्यसंस्कार हे शेतावरच केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या मृत व्यक्तीची रक्षा नदी व पाण्याच्या ठिकाणी विसर्जित केली जाते.            त्यामुळे पाणी दुषित बनते व पर्यावरणाला हानी पोहोचू शकते या जुन्या पारंपारिक पद्धतीला निकम कुटुंबियांनी फाटा देत पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून त्याच्या पुतण्याने सांगीतले इतर खर्च न करता त्यांची ओळख म्हणून आम्ही वृक्ष लागवड केली असे संदीप निकम दादाराव निकम लक्ष्मण गणेश निकम निकम धनराज निकम बापु निकम कुटुंबियांनी शेतावर खड्डे खोदून त्यात रक्षा टाकून अंत्यविधी परिसराच्या ठिकाणी २४ तास ऑक्सिजन देणारी व नाराळ, अंबा, चिकु वृक्षांसर इतर वृक्षांची लागवड केली व निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ किमान दहा झाडे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. असे मत संदीप निकम यांनी व्यक्त केले. या उपक्रमामध्ये कुटुंबातील महिलांनी व नातेवाईकांनी देखील सहभाग घेतला व वृक्षारोपण केले. वृक्षलागवड निमित्ताने आमच्या वडीलांच्या स्मृती कायम राहतील व वृक्षांचे संवर्धन होईल असा दुहेरी हेतू साध्य होईल, असे लक्ष्मण निकम यांनी सांगितले. यावेळी नातेवाईक मंडळी व नादरपुर येथील ग्रामस्थ उप-स्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments