Homeऔरंगाबादशेतकऱ्यांच्या घरी जाऊन आमदार बबनराव लोणीकरांनी साजरा केला दिवाळी पाडवा; दुष्काळाच्या संकटात...

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आमदार बबनराव लोणीकरांनी साजरा केला दिवाळी पाडवा; दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिला मायेचा आधार

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आमदार बबनराव लोणीकरांनी साजरा केला दिवाळी पाडवा; दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिला मायेचा आधार
1.परतवडी येथील शेतकरी रमेश आढे यांच्या घरी स्नेहभोजन करीत जाणून घेतल्या दुष्काळी परिस्थितीतील समस्या.
2.परतवडी, पाटोदा व आष्टी येथे विधवा, दिव्यांग, निराधार व गरजू शेतकरी कुटुंबांना किराणा किटचे वाटप.
3.फडणवीस सरकार दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; पाच हजार रुपयांची अग्रीम मदत आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमुळे कुटुंबांना दिलासा – आमदार बबनराव लोणीकर.
4.पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा; संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी धैर्य राखावे, आमदार लोणीकरांचे आवाहन
परतूर :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना संकटातून दिलासा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमा केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले हप्ते यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
           दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग आले तर लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. अशा वेळी त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांना धीर देणे आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असेही आमदार लोणीकर यांनी सांगितले.
           दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना याचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी हेच शेतीचे आणि ग्रामीण जीवनाचे प्रमुख साधन असून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आजपासूनच त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटात खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
          शेतकऱ्यांच्या घरी जाऊन साजरा केला दिवाळी पाडवा दिवाळी हा आनंद, उत्साह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक आर्थिक आणि नैसर्गिक संकटे उभी आहेत. अशा परिस्थितीत केवळ स्वतःच्या कुटुंबासोबत सण साजरा न करता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संवेदनशील उपक्रम आमदार बबनराव लोणीकर यांनी राबविला.
        दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने त्यांनी परतवडी येथील शेतकरी रमेश आढे यांच्या घरी भेट दिली. यावेळी आढे कुटुंबीयांसमवेत स्नेहभोजन करून दिवाळी पाडवा साजरा केला. लोकप्रतिनिधी आणि सामान्य शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ करणारी ही भेट ठरली. या भेटीचा उद्देश केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नव्हता, तर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेणे आणि त्यांना विश्वास देणे हा होता.
         यावेळी आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसायावर झालेले परिणाम, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ आकडेवारीच्या माध्यमातून न पाहता त्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
       गरजू शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आमदार बबनराव लोणीकर यांनी परतवडी, पाटोदा आणि आष्टी येथे विशेष सामाजिक उपक्रम राबविला. या ठिकाणी विधवा, दिव्यांग, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू शेतकरी कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा आणि सणाच्या काळात त्यांना काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
       समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणासुदीच्या काळात मदतीचा हात देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपणे हीच खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी आहे. दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. राजकीय पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचे नाते महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पाच हजारांच्या अग्रीम मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
      दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीमुळे तसेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमुळे अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक मदत मिळाली आहे.
        शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या अडचणीच्या काळात सरकारने त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारची भूमिका शेतकरीहिताची असून संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत आणि आधार देण्याचे काम सरकार करीत राहील, असा विश्वास आमदार लोणीकर यांनी व्यक्त केला.
आढे कुटुंबीयांनी आमदार लोणीकरांचे केले स्वागत, आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या घरी येऊन आमदार लोणीकरांनी दिवाळी साजरी केल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला असल्याची भावना व्यक्त केल्या
        दरम्यान गावातील भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून दिवाळी पाडवा साजरा केला.यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले भाजपा जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर , बाबासाहेब तेलगड रवींद्र सोळंके,प्रदीप ढवळे तुकाराम सोळंके, मधुकर मोरे, बबलू सातपुते बंडू मानवतकर गजानन लोणीकर, नितीन जोगदंड सिताराम राठोड, संभाजीराव खवल गणेशराव खवल संभाजी शिंदे बाळासाहेब लहाने दिगंबर गायकवाड, विष्णू गायकवाड, मनोज खवल, सुरेश पाटोतकर, गणेश महाराज, सतीश जगताप रामेश्वर जगताप, सतीश खवल, रमेश आढे कमल बाई आढे संतोष  आढे विमल आढे आसाराम जगताप सुभाष जगताप शेषराव वाडी बाबू आडे अनिल व्यवहारे राजकुमार आडे रामेश्वर आडे भगवान मोरे राजेश आडे अनिल आढे यांच्यासह मोठ्या संख्येने माता भगिनी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments