Homeऔरंगाबादहजारो भक्तांच्या उपस्थितीत भगवान महावीर मोक्ष कल्याणक कार्यक्रम संपन्न

हजारो भक्तांच्या उपस्थितीत भगवान महावीर मोक्ष कल्याणक कार्यक्रम संपन्न

हजारो भक्तांच्या उपस्थितीत भगवान महावीर मोक्ष कल्याणक कार्यक्रम संपन्न

छत्रपती सभाजीनगर :- जगाला अहिंसा, करूणा आणि दयेची शिकवण देणाऱ्या,भगवान महावीर निर्वाण कल्याणक निमित्त सकाळी 8.30 वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री 1008 कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर येथे सामूहिक निर्वाण लाडू चढवण्यात आला. आजच्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात मंगलाष्टकाने करण्यात आली. त्यानंतर कलिकुंड पार्श्वनाथ भगवंताचा अभिषेक करून समुचित विश्व शांती साठी शांतीमंत्र करण्यात आला. सौ ऐश्वर्या स्वप्निलजी इंगलवार रवि मसाले हे शांतिमंत्राचे लाभार्थी ठरले तसेच द्वितीय शांतीधारा करण्याचा मान  चि. चिंतामणी सुनिलजी मेहेत्रे यांना मिळाला.
      भगवान महावीर स्वामीच्या मोक्ष कल्याणक निमित्य मुख्य निर्वाण लाडू चढवण्याचा मान सौ आशा रवीजी दलाल यांना मिळाला. भगवान महावीर स्वामीचे सामुहिक पूजन करण्यात आले, निर्वाण लाडू चढवल्यानंतर हजारो भक्तांनी महावीर स्वामीचा जयजयकार केला आणि सर्वांनी एकत्रित भगवतांची काकड आरती केली. या कार्यक्रमा प्रसंगी  नवीन जिर्णोध्दार झालेल्या मानस्तंभाचा वेदी प्रतिष्ठा महोत्सव दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर रोजी होणार असून त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे विमोचन सर्व सन्मानित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आगामी मानस्तंभ वेदी प्रतिष्ठा महोत्सवात संपूर्ण दिगंबर जैन समाजाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन मंदिर चे अध्यक्ष श्री अमोल आदिनाथ जी मोगले यांनी केले. आचार्य पवित्र सागरजी महाराज ससंघ यांचे मंगल सानिध्य या कार्यक्रमाला लाभणार आहे.
       निर्वाण कल्याणक कार्यक्रमाच्या यशस्विते साठी  मंदिराचे सचिव श्री निलेश सावळकर, प्रकाश भाकरे,     (आ.आर्यनंदी छात्रावास अध्यक्ष श्री वर्धमान जी वायकोस)  शेखर वायकोस, बाहुबली धोंगडे, राजकुमार जी कुरकुटे यांनी श्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्री विलास जी जोगी यांनी केले, तसेच प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ सविता प्रविणजी गोसावी,सौ मंगला क्षीरसागर,सौ मंजुषा सिंगलकर, सौ लता अन्नदाते, सौ लता महाजन, सौ संजीवनी बाळशेटे, सौ मीना आहेरकर, सौ वैशाली सांगोले, सौ अर्चना मोगले, सौ अश्विनी वायकोस, सौ पल्लवी वायकोस तसेच ज्युडो युवा ग्रुप आदींनी प्रयत्न केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments