चंदनझिरा पंचमुखी नगर परिसरात वादातून मारहाण व धमकीचा आरोप; दोन व्यक्तींविरुद्ध पोलिसांत एन.सी.आर. दाखल!
जालना :- जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील पंचमुखी नगर, इंद्रायणी स्मार्ट परिसरात वादातून मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खुर्शीद खान फिरासद खान यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांकडून प्राप्त झालेल्या एन.सी.आर. अहवालानुसार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर एन.सी.आर. क्रमांक ०६६३/२०२६ असा आहे.
दरम्यान, परिसरात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि तक्रारदाराला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
