नादरपुर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास कृषी सहाय्यक मनीष राठोड ग्रामपंचायत प्रशासकीय सरपंच व ग्रामपंचायत माजी उपसरपंच सदस्य तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समीत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.