Friday, October 2, 2026
Homeऔरंगाबादभोकरदन येथील ‘जनविकास संस्था’ येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती...

भोकरदन येथील ‘जनविकास संस्था’ येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

भोकरदन येथील ‘जनविकास संस्था’ येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

भोकरदन :- येथील नामांकित सामाजिक संस्था ‘जनविकास संस्था’ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत आदरपूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या कार्यालयात दोन्ही थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांनी दोन्ही महामानवांच्या स्मृतींना उजाळा देत विनम्र अभिवादन केले.
    याप्रसंगी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या मूल्यांचे महत्त्व विशद केले. बापूंचे विचार हे केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित नसून आजच्या काळातही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, असे मत यावेळी व्यक्त झाले. तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि त्यांनी दिलेल्या “जय जवान, जय किसान” या ऐतिहासिक घोषणेचे स्मरण करून देशाच्या संरक्षणात व कृषी क्षेत्रात या विचारांची असलेली प्रासंगिकता अधोरेखित करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments