महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तहसिलदार,नायब तहसिलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
