Homeऔरंगाबादजन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वर्धमान नगर परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती, न्यू एरा हॉस्पिटलचे प्रमुख आनंद संचेती, उज्वल पगारिया, डॉ. निलेश अग्रवाल, हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंटच्या प्रियंका सावंत, विधिरा मिश्रा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. मेडिकल केअरमध्ये राज्यासह देशात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे विविध देश आरोग्य सुविधेसाठी भारताला प्राधान्य देत आहेत.

राज्यात अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासोबतच सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा पद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दोन हजार ४०० आजारांचा जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्यंत दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

संचालक डॉ. आनंद संचेती यांनी स्वागत करून प्रास्ताविकात न्यू एरा रुग्णालयात उपलब्ध सुविधांची माहिती दिली. या रुग्णालयात ३०० बेडची सुविधा असून एआय डिजिटल मेमोग्राफी, तत्काळ एमआरआय करण्याची सुविधा यामुळे कर्करुग्णांना दिलासा मिळणार आहे. या संस्थेतर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून भविष्यात रुग्णसेवेसाठी विविध प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. आभार निलेश अग्रवाल यांनी मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments