Homeऔरंगाबादअंबड-घनसावंगी रोडवरील खुनाचा अवघ्या ६ तासांत छडा; दोन आरोपी जेरबंद!

अंबड-घनसावंगी रोडवरील खुनाचा अवघ्या ६ तासांत छडा; दोन आरोपी जेरबंद!

अंबड-घनसावंगी रोडवरील खुनाचा अवघ्या ६ तासांत छडा; दोन आरोपी जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी ताब्यात; अंबड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
जालना/प्रतिनिधी/ अंबड ते घनसावंगी रोडवरील पांगरखेडा शिवारात झालेल्या खुनाच्या घटनेचा अंबड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत दोन आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल टॉवर लोकेशन,कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.दि.२३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पांगरखेडा शिवारात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.मृत व्यक्तीची ओळख मुस्तकीम गफ्फार शेख (वय २१,रा. शिशटेकडी,जुना जालना) अशी पटली.तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शाहेद सलीम बेग (वय २०) व भारत शाहदेव वैद्य (वय २०,दोघेही रा.अंबड) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.आरोपी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने तातडीने रवाना होऊन दोघांनाही ताब्यात घेतले.गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका
        ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ.विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव,अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके,तसेच पोलीस उपनिरीक्षक अमित म्हस्के,पोलीस उपनिरीक्षक रोहण जावळे,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार रमेश राठोड,सागर बाविस्कर,दत्ता वाघुंडे,कैलास खांर्डे,अक्रुर धांडगे,बाबा गायकवाड, गणपत पवार,अशोक जाधवर,विलास वाघमारे,अलका केंद्रे,सुनील वैद्य,संजय क्षीरसागर, तुकाराम मदन,अशोक भांगळ,विजय केंद्रे,कपुरचंद जारवाल,नितीन झोटे,सोमनाथ गायकवाड आणि विठ्ठल वैराळ यांनी सहभाग घेतला.खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत छडा लावून आरोपींना ताब्यात घेतल्याने अंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.आरोपींकडे चौकशी सुरू असून, खुनामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments