Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादघनसावंगी तालुक्यात पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना आला वेग ३०० रुपयांची रोजंदारी...

घनसावंगी तालुक्यात पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना आला वेग ३०० रुपयांची रोजंदारी देऊन महिला मजुरांकडून काढून घ्यावे लागतेय तण

घनसावंगी तालुक्यात पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना आला वेग
३०० रुपयांची रोजंदारी देऊन महिला मजुरांकडून काढून घ्यावे लागतेय तण
घनसावंगी/प्रतीनीधी/ घनसावंगी तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतात ठीकठिकाणी तण वाढले आहे. मागील ८ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पिकांना खत घालणे, फवारणी, वखरणी यासह खुरपणी या कामांना वेग आला आहे. जून महिन्यात पडलेल्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसावरच अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकल्या. तालुक्यात दोन मुसळधार पाऊस वगळता केवळ रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे सर्वच महसूल मंडळात पिके जोमाने डोलत असली तरी तालुक्यातील सर्व तलाव अद्यापही भरले नसल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिमझिम पावसात पिकांत वाढलेले तण खुरपणीच्या माध्यमातून काढण्याच्या कामासह आंतरमशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग येत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments