Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबाददुष्काळी पंचनाम्यांना वेग; महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी बांधावर!

दुष्काळी पंचनाम्यांना वेग; महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी बांधावर!

दुष्काळी पंचनाम्यांना वेग; महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी बांधावर!

पावसाच्या खंडामुळे खरीप पिके धोक्यात;एकही शेतकरी मदतीपासून वंचित नको…
आत्ताच एक्सप्रेस 
पैठण/प्रतिनिधी/ पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने परिसरातील खरीप पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. ग्राम महसूल अधिकारी ज्योती गुसिंगे आणि ग्रामविकास अधिकारी मनीषा ठोंबरे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत नुकसानीची अधिकृत नोंद घेण्यास प्रारंभ केला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या तातडीच्या मदतीकडे लागले आहेत.
       पिके सुकली, बळीराजा हवालदिलयंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने तसेच मोसमाच्या सुरुवातीपासूनच मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कपाशीसह इतर खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागांत शेतातील उभी पिके वाळल्याने उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेरणी, खते, औषधे आणि मशागतीचा झालेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments