अंबड सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल भर दिवसा सास-याचा खुन करणा-या जावायास जन्मठेप
जालना/प्रतिनिधी/ अंबड येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जे.जे.बेग साहेब यांनी आरोपी नामे किशोर शिवदास पवार वय ३८ रा.आडुळ,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर यांस सास-याचा खुन केल्याप्रकरणी जन्मठेप व दंड ठोठावला.घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, अंबड येथील शंकर नगर येथे मयताच्या घरी दि. २९.०३.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मंदाकिनी गिज्ञानदेव भोसले व तिचा भाऊ पारलेस काळे आणि मयत पंडीत भानुदास काळे असे मयताच्या घरी असताना फिर्यादीची बहिण नंदा हिचा नवरा आरोपी किशोर व त्याचे मित्र नितीन लाला जाधव व आरोपी बाल आपचारे,अजय दिगंबर आंबेकर यांना यातील फिर्यादी साक्षीदार व मयत हे अनुसुचित जाती व जमातीचे सदस्य आहेत हे त्यांना माहित असताना सुद्धा आरोपी व बाल आपचारे यांनी संगनमत करुन मयताच्या घरी येऊन त्यांना आरोपी क्र.१ किशोर याने मयतास शिवीगाळ करुन “तु माझी बायको नांदायला का पाठवित नाही” असे म्हणुन आरोपी क्र.१ किशोर आरोपी क्र.२ नितीन आरोपी क्र.३ अजय या सर्वांनी मिळुन फिर्यादीचे वडीलास (मयतास) लाथाबुक्क्याने मारहाण केली व आरोपी.१ याने त्याच्याकडील बदुकीतुन मयताच्या गळयावर व पाठीवर अशा दोन गोळया मारुन खुन करुन सोबत आणलेल्या मोटार सायकलवर बसुन पळुन गेले.तसेच गुन्हा घडल्यानंतर आरोपी क्र.१ किशोर याने पाचोड येथे जाऊन आरोपी क्र.३ सचिन प्रकाश पवार यास त्याने आरोपी क्र.४ धर्मा मुबारक काळे याचे कडुन खरेदी केलेल्या बंदुक पिस्टल ने गोळया मारुन त्याचे सास-यास जिवे ठार मारल्याचे सांगुन गुन्हयात वापरलेली बंदुक पिस्टल आरोपी संचिन याच्याकडे लपवायला दिल्याचे निश्पन्न झाले.म्हणुन अशा आशयाची फिर्याद फिर्यादी मंदाकिनी गिज्ञानदेव भोसले हिने अंबड पोलीस स्टेशनला दि.२९.०३.२०२३ रोजी दिल्यावरुन गुन्हा क.२१५/२०२३ नोंद करुन आरोपी विरूद्ध भा.द.वि कलम ३०२, ४४९,३२३,५०४,५०६ ३४ सह ३/२५ भारतीय हत्यार कायदा सह कलम ३(२), (व्ही ए), अ.जा.ज.अ.प्र.का प्रमाणे नोद करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक साजिद अहेमद यांनी करुन आरोपी किशोर शिवदास पवार या आरोपीस रा.आडुळ आणि उर्वरित फरार आरोपी याच्या विरूद्ध कलम सी.आर.पी.सी.२९९ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी मंदाकिनी भोसले,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पारलेश काळे,गिज्ञानदेव भोसले,घटनास्थळ पंच, कपडे जप्ती पंच,मोटारसायकल जप्ती पंच, अंगझडती पंच,निवेदन पच जप्ती पंचनामा यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या.सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक जालना श्री तेगबीरसिंग संधु,डी. वाय.एस.पी सिद्धेश्वर धुमाळ,अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि साजिद अहेमद यांनी सखोल तपास केला.तसेच पो.उप.नि.आदिनाथ ढाकणे,डी.वाय.एस.पी मुकुंद आघाव,सुनिल पाटील तर सरकार पक्षातर्फे श्री.अँड.वाल्मीक आ घुगे जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता,अंबड यांनी अत्यंत प्रभावी युक्तीवाद करून सदर प्रकरणात काम बघीतले.सदरील युक्तीवाद ग्राहय धरुन विद्यमान न्यायालयाने आरोपीस जन्मठेप आणि रुपये १६०००/- दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा दोठावण्यात आली तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार बळीराम खैरे,उषा अवचार आणि मथाची पांढरे यानी सहकार्य केले.