Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री नगरपंचायतने  मंजूर केलेले घरकुलाचे काम पूर्ण,  घरकुल धारकांना तत्काळ निधी देत...

फुलंब्री नगरपंचायतने  मंजूर केलेले घरकुलाचे काम पूर्ण,  घरकुल धारकांना तत्काळ निधी देत नसल्याने उपोषण सुरू 

फुलंब्री नगरपंचायतने  मंजूर केलेले घरकुलाचे काम पूर्ण,  घरकुल धारकांना तत्काळ निधी देत नसल्याने उपोषण सुरू 

फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री नगरपंचायती च्या वतीने मंजूर केलेले घरकुलाचे काम पुर्ण झाले पण घरकुल धारकांना निधी देत नसल्याने नागरिकांनी काल दिनांक 20 मे 2026 रोजी फुलंब्री नगरपंचायती च्या समोर उपोषण करण्यात आला आहे .
नागरिक
नगरपंचायत कार्यालय येथे चकरा मारत आहे व अधिकारी आणि मुख्याधिकारी हे सांगत आहे कि आमच्या कडे निधी उपलब्ध नाही घरकुल धारकांनी उसने पेसे घेऊन घरांचे बांधकाम सुरु केले आणि आता ते कर्जबाजारी झालेले असून काही लाभार्थीनी व्याजाने कर्ज काढून काम केले आहे.
तरी पण नगरपंचायती ने घरकूल धारकांना निधी उपलब्ध करून दिला नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. जोपर्यंत निधी देत नाही तो पर्यंत नगरपंचायती समोर आमरण उपोषण सुरु राहिल असे उपोषण कर्त्यांनी सांगितले. या संदर्भात तहसीलदार
 पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या प्रसंगी
कैसर सत्तार पटेल , युनुस रज्जाक शेख राहुल काथार , अनवर पटेल, भगवान गंगावणे, एजाज चिश्ती, बशीर शहा, मोबीन शहा पाशा यांच्या सह आदींची उपस्थिती होती. तसेच उपोषण कर्त्यांना स्थानिक नागरिकांनी भेट दिली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments