जिल्हा परिषद शाळा रयगव्हाण येथे शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्नेहभोजनचा कार्यक्रम संपन्न
दैनिक आताच एक्स्प्रेस
हादगाव/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रयगव्हाण येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शिक्षण दिनाचे औचित्य साधून रायगव्हाण विद्यालयात शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व शिक्षकानी महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापकानी शिक्षण दिनाचे महत्त्व सांगितले सावित्राबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह व शिक्षक यांना शुभेच्छा देऊन स्नेह भोजन शाळेतील मैदानावरील चुलीवरील स्वयंपाक विद्यार्थी विद्यार्थिनींनी केला. शिक्षकांना बनवून दिले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले..स्नेहभोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, परस्परांमध्ये प्रेम व सहकार्य वाढावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.