Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादश्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’चा...

श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’चा जयघोष

श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’चा जयघोष
टेंभुर्णी :- जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी शहरासह परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला येथील घरोघरी लाडक्या बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी अबालवृद्धांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. रात्री १२ वाजता जसा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, तसा संपूर्ण परिसरात “हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की…”आणि “गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा” असा जयघोष करण्यात आला.
रात्री ठीक १२ वाजता पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवून महिलांनी पारंपरिक पाळणा गीते गाऊन जन्मोत्सव साजरा केला. यानंतर बाळकृष्णाला सुंठवडा, पेढे आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवण्यात आला. अनेकांनी या पवित्र दिनी उपवास धरला होता. घराघरांसोबतच परिसरातील विविध मंदिरांमध्येही आकर्षक सजावट आणि विशेष भजनांचे आयोजन करण्यात आले होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments