Thursday, April 9, 2026
Homeऔरंगाबादइराणचा विजय;डोनाल्ड ट्रम्पची मग्रुरी उध्वस्त होऊन इराणपुढे शरणागती

इराणचा विजय;डोनाल्ड ट्रम्पची मग्रुरी उध्वस्त होऊन इराणपुढे शरणागती

प्रति,माननीय संपादकजी
विषय:-इराणचा विजय;डोनाल्ड ट्रम्पची मग्रुरी उध्वस्त होऊन इराणपुढे शरणागती.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ ला डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत युध्दाला सुरुवात करून मानवी क्रृरता दाखविली आणि आज ४० दिवसांनंतर मोठमोठी धमकी देणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा कट्टर दुष्मण समजला जाणाऱ्या चीनच्या माध्यमातून इराणला शरण आल्याचे दिसून येते.युध्दविराम १४ दिवसांसाठी का होईना झाले याचे मनापासून स्वागत यामुळे शांती प्रस्थापित करण्यासाठी मोठी मदत होईल.कारण युद्धामुळे कोणाचेच हित साध्य झाले नाही आणि होणार नाही.अमेरिकेला गैरसमज होता की,इराणवर लवकरात लवकर विजय प्राप्त होईल.परंतु या युध्दाला आज ४० दिवसांचा काळ लोटला यात अमेरिकेचे अरबोखरबो डॉलर स्वाहा झाले.सोबतच मिडलिस्ट मधील ज्या-ज्या ठिकाणी अमेरिकन लष्करी तळ आहे अशा पश्चिम आशियात (मध्य पूर्व) अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत, ज्यात कतार, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती(युएई), जॉर्डन, ओमान,इराक, दुबई आणि सीरिया या देशांची मानवीय व वित्तीय हाणी मोठ्या प्रमाणात झाली असून आजही नागरिक भयभीत आहेत आणि आज हे संपूर्ण देश ५० वर्षे मागे ढकलल्या गेले याचे मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले बेकायदेशीर युद्ध.या मुद्द्यावरून स्पष्ट होते की, अमेरिका स्वार्था व लालची देश आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ट्रम्प जगाचा क्रृर हत्यारा झाल्याचे सिद्ध झाले आहे.कारण एवढे पाप हिटलरने सुध्दा केले नसावेत त्यापेक्षा हजार पटीने पाप डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे आणि याचे प्रायश्चित्त जगापुढे शरणागती पत्करून  भोगावे लागत आहे.आज नाटो, युरोपीय देश, ब्रिटन, फ्रान्स,अमेरिकन नागरिक,अमेरिकेचे मित्र देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या निर्णयाचा धिक्कार करीत आहे व डोनाल्ड ट्रम्प मानवतेचा व विश्व शांतिचा हत्यारा समजत आहे.अमेरिकेने नेहमीच अनेक देशांना रक्ताच्या लाथोळ्यात सोडून पळ काढला ही बाब सर्वांनाच ग्यात आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम आशियातील ( मिडलिस्ट)देशांची करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आपली करारी हार लक्षात घेता,मिडलिस्टला रक्ताच्या लाथोळ्यात सोडून पसार होण्याच्या मार्गावर आहेत. इराणवर आक्रमक करून ताबडतोब होर्मुझ व खार्ग बेटावर कब्जा करून तेल कंपन्यांनवर आपले नियंत्रण ठेवु अशी धारणा डोनाल्ड ट्रम्प यांची होती परंतु त्याची संपूर्ण चाल फसली.सुपर पॉवर समजणारा डोनाल्ड ट्रम्प आज इराण व चीनच्या पायावर लोटांगण घालत असुन लाचारी पत्करल्याचे दिसून येते.आज ट्रम्पची संपूर्ण हेकडी चुरचुर झाली आहे.या दोन आठवड्यांच्या( १४ दिवसांच्या )युद्ध विराममध्ये इराणने आपल्या १० अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत तर अमेरिकेने आपल्या १५ अटी इराण समोर ठेवल्या आहेत.युध्दविराम जगासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी ताबडतोब खोलण्यात आले आहे.कारण होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने अनेक देशांचे हजारो जहाज समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी थांबले आहेत.परंतु युध्दविराममुळे जगातील २० ते २५ टक्के तेल वाहून नेणारे शेकडो जहाजांचे आवागमन सुरू झाले आहे.या संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते की ट्रम्पनी आपली हार स्विकार केली असून शरणागती पत्करली आहे.होर्मुझ सामुद्रधुनी वरून जाणाऱ्या जहाजांकडुन इराणने टोल टॅक्स वसुलण्याची अट ठेवली आहे.अमेरिकेने इराणला एवढ्या जखमा दिल्या आहेत की,इराण कधीही विसरणार नाही आणि या जखमा जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहील्या आहे. अमेरिका-इस्त्रायलने एवढ्या जखमा देऊन व उच्च पदस्थ नेते व टॉप कमांडर मारल्या जाऊनही इराण ताट मानाने उभे राहून अमेरिका-इस्त्रायलला जशास तशी टक्कर दिली आणि ही टक्कर जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी पहाली व ही लढाई जिंकून दाखवली.या युध्दावरून स्पष्ट होते की,ज्याचे युद्ध त्यालाच लढावे लागेल कोणीही कोणाला मदत करणार नाही. अमेरिका कितीही बलाढ्य असला व सुपर पॉवर असला तरी त्याला आज छोट्याशा इराण समोर गुढग्यावर येवून झुकावे लागले.म्हणुन या अत्याधुनिक युगात कोणत्याही देशांनी मुजोरी करू नये मुजोरी केली डोनाल्ड ट्रम्प सारखे हालबेहाल इतरांचे सुध्दा होऊ शकतात यालाही नाकारता येत नाही.या युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे सोबतच पश्चिम आशियातील मध्यपुर्व देश आज ५० वर्षे मागे गेले आहेत. कारण यात मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तीय झाली आहे आणि ही हाणी व जखमा अनेक काळापर्यंत प्रत्येकांच्या हृदयात घर करून राहिल.या युद्धविराममध्ये लेबनॉनसह युक्रेनला सुध्दा सहभागी करून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पुढाकार घेतला पाहिजे.कारण कोणतेही युद्ध असो त्यात आपल्याला फक्त विनाशच दिसून येईल.डोनाल्ड ट्रम्पची क्रृरता व लादलेले युद्ध तोडण्यासाठी इराणचे नागरिक,तरूण, कलावंत, खेळाडू, विद्यार्थी,प्राध्यापक यांनी अणुऊर्जा प्रकल्पाभोवती मानवी साखळी तयार करून डोनाल्ड ट्रम्प यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले.इराणवर अनेक परकीय आक्रमणे झालीत यात मुख्यत्वे करून चंगेज खान आणि तैमूरलंग यांनी इराणवर आक्रमक करून मोठी हाणी पोहचवली तरीही इराण डगमगला नाही.यानंतर इराण- इराक युद्ध ८ वर्षे चालली यातही इराणचा विजय झाला.यावरून स्पष्ट होते की इराणची भौगोलिक परिस्थितीच इराणचे मुख्य व अभेद्य सुरक्षा कवच आहे. इराणच्या मानवतेला माझा सलाम.जय हिंद.
रमेश कृष्णराव लांजेवार

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments