Tuesday, April 7, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी नितीन जाधव...

खुलताबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी नितीन जाधव यांची निवड

खुलताबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी नितीन जाधव यांची निवड

​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘खुलताबाद उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी  नितीन जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
​ही बैठक  कारभारी दादा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे आणि  महेंद्र घुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी जयंती उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
​अशी आहे नवनिर्वाचित समिती: नूतन अध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह सचिवपदी  शशिकांत घुसाळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून विकास घाटे, अमोल ढवळे, स्वप्नील लोखंडे आणि शुभम जाधव यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.​या बैठकीला साईनाथ केदारे, अनिल घुसळे, आनंद घुसळे, विरेंद्र वाघ, किशोर जाधव, माजी सरपंच द्वारकादास घोडके, धनाजी नागे, राजेश निकाळजे, रामदास निंभोरे, राहुल बनकर, ईश्वर देवकर, किरण गायकवाड, राजन घुसळे, सौरव केदारे, प्रवीण घुसाळे, राज ढवळे, रोहित वाघमारे, करण देवकर, चिरायु ढवळे, राज जाधव, सचिन निकाळजे, छबू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments