Tuesday, April 7, 2026
Homeऔरंगाबादशिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन - जास्तीत-जास्त...

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे

अंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला
उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन –
आज शिवसेनेचे विविध कार्यक्रम
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, जालना
विधानसभा मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या
पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव व
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे,जिल्हा समन्वयक परशराम
(पी.एन.)यादव यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून सर्व
शिवसैनिक,प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा
शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सर्व कार्यक्रम ५ एप्रिल
रोजी होणार आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हासंघटक भानुदास घुगे,जिल्हा समनवयक परशराम यादव,
महिला आघाडीच्या नवनियुक्त जिल्हासंघटक रुपमताई रमेश घुगे,  शिवसेना
उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे,भगवान कदम, मुरलीधर शेजुळ यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. तरी आपणास विनंती आहे की, आपण सर्व पदाधिकार्‍यांनी
५ एप्रिल रविवार रोजी वेळ दुपारी ३ वाजता स्थळ उगळे पाटील यांचे मातोश्री
कृषी पर्यटन केंद्र लालवाडी जालना – अंबड रोड येथे या बैठकीस उपस्थित
राहावे, असे आवाहन अंबड तालुकाप्रमुख दिनेश काकडे यांनी केले आहे. तर
बदनापूर येथे संत सावता माळी सभागृहात सायंकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन
करण्यात आले असून या बैठकीस जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, जिल्हा संघटक
भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख
रूपमताई घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तर जालना येथील शासकीय विश्रामगृह ४८८ अंबड चौफुली येथे दुपारी १ वाजता
बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,
भानुदास घुगे, मुरलीधर शेजुळ,भगवान कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख
रूपम घुगे,जिल्हा समनवयक परशराम (पी.एन.) यादव, शहरप्रमुख दिपक
रंनावरे,संदीप झारखंडे, शहर संघटक चेतन भुरेवाल यांची उपस्थिती राहणार
आहे.या सर्व कार्यक्रमास कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थित राहावे,
आवाहन जिल्हा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments