Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादजिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

बीड/प्रतिनिधी/ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत तालुकास्तरीय परीक्षा सोमवार, दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उत्साहात पार पडली.
तालुका बीडसाठी तुलसी संगणक महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. यावेळी आयु. मनोज वाघमारे, आयु. सुमेध जोगदंड, अशोक ठोकळ, तानाजी शिनगारे, अभिजीत जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. प्रकाश ढोकणे यांनी केले.
या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे तसेच चिकित्सक अभ्यासाची वृत्ती विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा स्तरावर प्रा. शशिकांत जावळे, आयु. प्रणित सरवदे, आयु. सुमेध जोगदंड, प्राचार्य प्रदीप गाडे, आयु. भारत मगर, आयु. प्रवीण तरकसे, ॲड. राजेश शिंदे, आयु. महादेव इनकर, प्रा. अशोक गायकवाड यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
तसेच तालुका समन्वयकांच्या माध्यमातून सर्व तालुक्यांत परीक्षा सुरळीत पार पडली. यामध्ये शिरूर (अनिता लाटे, जयेंद्र निकम), आष्टी (प्राचार्य रत्नकांत निकाळजे, डॉ. चंद्रकांत साळवे), पाटोदा (प्राचार्य अस्मिता जावळे, पृथ्वीराज जावळे), वडवणी (बाबा जाधव, दीपक वडमारे), धारूर (रुद्र सर, सिरसाठ सर), परळी (गायकवाड सर), केज (दादा गायकवाड), माजलगाव (प्रमोद साळवे, अमोल राऊत), गेवराई (भारत मगर, सदाफुले) तसेच बीड (प्रा. प्रकाश ढोकणे) यांनी मोलाची भूमिका बजावली.
तालुकास्तरावर निवड झालेल्या टॉप-१० विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय अंतिम परीक्षा रविवार, दि. 5 एप्रिल 2026 रोजी तुलसी संगणक महाविद्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments