Thursday, April 2, 2026
Homeऔरंगाबादएसआयआर च्या कामात हलगर्जीपणा, संबंधित अधिकारींनी लक्ष द्यावे, समाजिक कार्यकर्ता सय्यद जुल्फेखार 

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा, संबंधित अधिकारींनी लक्ष द्यावे, समाजिक कार्यकर्ता सय्यद जुल्फेखार 

एसआयआर च्या कामात हलगर्जीपणा, संबंधित अधिकारींनी लक्ष द्यावे, समाजिक कार्यकर्ता सय्यद जुल्फेखार 
फुलंब्री/प्रतिनिधी/  मतदार यादी चे विशेष गहन पुननिरीक्षण एसआयआर   चे कामात होत असलेल्या दिरंगाई व हलगर्जीपणा थांबवा अशी मागणी फुलंब्रीतील समाजिक कार्यकर्ता सय्यद जुल्फेखार यांनी काल दिनांक 1 एप्रील 2026 रोजी फुलंब्री तहसील कार्यालयातील निवडणुक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, फुलंब्री शहरात मतदार यादी चे विशेष गहन पुननिरीक्षण  अर्थात  एसआयआर अंतर्गत होत असलेल्या सर्वेक्षणात गदारोळ होत आहे, अनेक नाव नजर चुकीमुळे 2002 च्या यादीत नसल्याने अश्या मतदारांना मॅपिंग करतांना मोठा त्रास होत असून सदरील मतदार हे  मॅपिंग पासुन वंचित राहण्याची शक्यता आहे तसेच  ज्याचे नाव 2002 च्या मतदार यादीत असुन सुद्धा मॅपिंग करतांना नांव ऑनलाईन दिसत नाही. तसेच मतदार यादीचे एसआयआर
 चे काम पारदर्शक व इमान इतबारे व्हावे म्हणून संबंधित बुथ स्तर अधिकारी  बीएलओ यांना अर्थात मतदारांशी संपर्क साधून मॅपिंग  करण्याची प्रक्रिया करणे सक्तीचे आहे असे असुन सुद्धा बरेचशे बीएलओ बसल्या सदरची प्रक्रिया पुर्ण करीत आहेत ज्या मुळे  मॅपिंग विना मतदारांची नांवे कमी होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ज्या मतदाराचे नांव 2002 च्या यादीत नाही व 2024 च्या यादीत आहे अशा मतदारांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने निवडणूक आयोगाने ठरवुन दिलेल्या 14 पुरावे पैकी कमीत कमी कोणतेही एक पुरावा घेऊन बीएलओ यांनी मॅपिंग करणे आवश्यक आहे परंतु बीएलओ असे करतांना  दिसत नाही.व तसेच यादी क्र 102 बीएलओ अनुपस्थित राहत असून SIR चे काम हलगर्जीपणा करुन व मनमानी करुन जिवावर येत असल्या प्रमाणे संबंधित बीएलओ करीत आहेत. शहरात होत असलेल्या मतदार यादी चे एसआयआर  चे काम बीएलओ यांनी घरो घरी जाऊन मतदारांना भेटुन करावे कोणतेही नागरीक या पासुन सुटला न पाहीजे याची दक्षता घ्यावी व तसेच एसआयआर संबंधी काही अफवांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे काही लोकं एसआयआर संदर्भात चुकीचे माहीती देत आहे की ज्या चे नांव 2002 च्या यादीत नाही त्यांचे नांव नेहमी करीता कमी होणार आहे व  त्यांना पुढे कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही, त्यांना हाकलुन लावणार आहे अश्या अफवा पसरविणार्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच  बीएलओ मार्फत किंवा जनजागृती करुन  नागरीकांमधील भिती दुर करण्यासाठी त्यांना समजवुन सांगुन व खरी माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात यावे.
   सामाजिक कर्येकर्ते सय्याद जुलफेखार यांनी निवडणूक अधिकारी यांच्या कडे तक्रार  केली आहे .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments