Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादखुलताबाद नगरपरिषदेचा थकबाकीदारांना' दणका; हावदळी दरवाजा चौकातील २ दुकाने सील!

खुलताबाद नगरपरिषदेचा थकबाकीदारांना’ दणका; हावदळी दरवाजा चौकातील २ दुकाने सील!

खुलताबाद नगरपरिषदेचा थकबाकीदारांना’ दणका; हावदळी दरवाजा चौकातील २ दुकाने सील!

नगरपरिषद प्रशासन
​​थकबाकीदारांविरुद्ध खुलताबाद नगरपरिषदेची ‘ॲक्शन मोड’मध्ये कारवाई;
​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद नगरपरिषदेने कर वसुलीसाठी आता कंबर कसली असून, वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. आज खुलताबाद शहरातील गजबजलेल्या हावदळी दरवाजा चौक परिसरात नगरपरिषदेच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन व्यापारी दुकाने सील केली.या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.थकीत कर: संबंधित दुकानदारांकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची तब्बल दोन लाख रुपयाच्या दरम्यान रक्कम प्रलंबित होती. मुख्याधिकारी शेख समीर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दुकानांना टाळे ठोकले यापूर्वी अनेकदा नोटिसा बजावूनही प्रतिसाद न मिळाल्याने ही टोकाची भूमिका घ्यावी लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.​”मालमत्ताधारकांनी कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी आपला कर वेळेत भरावा, अन्यथा जप्ती आणि सील करण्याची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. ​खुलताबाद शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा महसूल जमा करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पाऊल उचलले आहे. दीर्घकाळापासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकविणाऱ्या
हावदळी दरवाजा दरवाजा चौकातील दोन दुकानांवर मार्च महिन्याचे शेवटच्या सोमवारी सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेच्या विशेष वसुली पथकाने ३० मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही मोहीम राबवली.
कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे. व वसुली पथकाच्या वतीने सांगण्यात आले की,या थकबाकीदारांना यापूर्वी कायदेशीर नोटिसा पाठवून वारंवार संधी देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणे संबंधित दुकानदारांना महागात पडले आहे. नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, ही केवळ सुरुवात असून आगामी काळात शहरातील इतर मोठ्या थकबाकीदारांवरही अशीच कठोर कारवाई केली जाणार आहे.कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया देखील राबवली जाऊ शकते.या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, इतर थकबाकीदारांनी आता कर भरण्यासाठी नगरपरिषदात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments