Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादलासुर स्टेशन येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली होती

लासुर स्टेशन येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली होती

लासुर स्टेशन येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणुक काढण्यात आली होती

सकल जैन समाजाच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे भगवान महावीर जयंती निमित्त सकल जैन समाजाच्यावतीने सकाळी आठ वाजता भगवान महावीर चा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या मदतीने कसलेही ध्वनी प्रदुषण झाले नाही याची दक्षता घेत आयोजन केले होते. लासुर स्टेशन येथील सकल जैन समाजाचे ढोल पथक बँड बाजा हे विशेष आकर्षण ठरले. मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, ते परत महावीर मंदिर अशा मार्गे मिरवणुक मार्गस्थ झाली. त्यानंतर भगवान महावीर यांचा जन्मउत्सव प्रसंगी पाळणा कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान या मिरवणुकीमध्ये लहान थोरांपासून महिला भगिनी, समाजबांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. भगवान महावीर जयंती सकाळी बारावाजेच्या सुमारास जय मंगल कार्यालयात येथील महाप्रसादाचा एवम भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व लासुर स्टेशन येथील सकल जैन समाज उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments