Tuesday, April 7, 2026
Homeऔरंगाबादइंदुबाई इंटरनॅशनल स्कुल मध्ये डाॅक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा

इंदुबाई इंटरनॅशनल स्कुल मध्ये डाॅक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा

इंदुबाई इंटरनॅशनल स्कुल मध्ये डाॅक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा
आष्टी/प्रतिनिधी/ आज 1 जुलै हा दिवस भारतभर राष्ट्रीय डाॅक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या अतुलनीय सेवेला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे. डॉक्टरांचा व्यवसाय केवळ एक नोकरदार काम नाही, तर तो मानवतेची सेवा करण्याचा एक महान मार्ग आहे. राष्ट्रीय चिकित्सक दिवस प्रसिद्ध डॉक्टर आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आष्टी आणि परिसरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टरांचा इंदुबाई इंटरनॅशनल स्कूल येथे त्यांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा सन्मान करण्यात आला. मानवतेची अविरतपणे सेवा करणारे देव म्हणजे डॉक्टर…. या डॉक्टर डे च्या निमित्ताने स्कूलमध्ये आष्टी शहरातील व परिसरातील डॉक्टरांचा व त्यांच्या कार्याचा यथोचित मानसन्मान स्कुलच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उमरे, डॉ.वाघमारे साहेब, डॉ.सरकटे साहेब ,डॉ. कापसे साहेब, डॉ. बरसाले साहेब, डॉ.आर.टी.राठोड साहेब , डॉ .जमिनदार साहेब, डॉ. अर्चना मॅडम उमरे, डॉ. खेत्रे मॅडम, डॉ. आरती  मैंद मॅडम, श्रीमती शिंदे मॅडम, डॉ.प्रदीप राठोड साहेब,डॉ. काटे साहेब, डॉ. नाईकनवरे साहेब ,डॉ. पताळे साहेब, डॉ. लाटे साहेब, डॉ. पंकज थोरात साहेब, डॉ . गणेश थोरात साहेब,डॉ.आकाश घुले साहेब ,डॉ. राम सोळंके साहेब ,डॉ. दीपक भदर्गे साहेब,डॉ. आर के पठाण साहेब ,डॉ. पाटील साहेब, डॉ. अन्सारी साहेब,डॉ. डव्हळे साहेब, स्कुलचे संस्थापक अध्यक्ष श्री.तुकाराम (आबा) सोळंके, प्रिन्सिपल श्री.कंटुले सर, श्री.रमेशभैय्या थोरात यांची उपस्थिती होती…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम.बी.गुंजकर सर आणि आभार कंटुले सर यांनी मानले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments