Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादवेरूळ लेणीतील मार्गदर्शकांची (गाईड्स) मनमानी आणि पर्यटकांची लूट; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वेरूळ लेणीतील मार्गदर्शकांची (गाईड्स) मनमानी आणि पर्यटकांची लूट; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वेरूळ लेणीतील मार्गदर्शकांची (गाईड्स) मनमानी आणि पर्यटकांची लूट; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

​खुलताबाद/प्रतिनिधी/ जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसर सध्या केवळ ऐतिहासिक वैभवासाठीच नाही, तर तेथील काही व्यावसायिक गाईड्सच्या मनमानी कारभारामुळे आणि पर्यटकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे चर्चेत आला आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी लेणी क्रमांक १६ (कैलास मंदिर) परिसरात एका धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, एका भारतीय महाविद्यालयीन तरुण आपल्या परदेशी मित्रासोबत (विदेशी विद्यार्थी) वेरूळ लेणी पाहण्यासाठी आला होता. हे दोघेही एकाच महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेतात. लेणी फिरत असताना तो भारतीय विद्यार्थी आपल्या परदेशी मित्राला या ऐतिहासिक वारशाची माहिती देत होता. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या काही गाईड्सनी त्यांना मध्यंतरी अडवले आणि “तुम्ही स्वतः माहिती देऊ नका, यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे,” असे सांगून त्यांना माहिती देण्यापासून रोखले.​यावर त्या भारतीय विद्यार्थ्याने संताप व्यक्त करत म्हटले, “हा परदेशी नागरिक माझा मित्र आणि वर्गमित्र आहे. आम्ही दोघे सोबत शिकतो. जर मी माझ्या मित्राला आपल्या देशाच्या इतिहासाची माहिती देत असेल, तर त्यात काय चुकले? स्वतःच्या मित्राला माहिती देण्याचा अधिकार आम्हाला नाही का?” या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​₹२००० घेऊन केवळ एकच लेणी दाखवणार; वृद्ध गाईड्सना सेवानिवृत्त करण्याची मागणी
​पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरूळ लेणी परिसरात गाईड्सची मोठी मक्तेदारी (मोनोपोली) निर्माण झाली आहे.विदेशी आणि इतर पर्यटकांकडून तब्बल ₹२,००० एवढी मोठी रक्कम फी म्हणून उकळली जाते. नियम आणि कर्तव्यानुसार गाईड्सनी पर्यटकांना लेणी क्रमांक १ पासून ते ३२ पर्यंतच्या सर्व लेण्यांची सविस्तर माहिती देणे अनिवार्य आहे. मात्र, पर्यटकांची दिशाभूल करून त्यांना केवळ महत्त्वाची असलेली ‘लेणी क्रमांक १६’ दाखवली जाते आणि अर्धी-अधुरी माहिती देऊन पर्यटकांची सरळ-सरळ आर्थिक लूट केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments