Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादमैत्रीची सातासमुद्रापार झेप! मित्राच्या हॉटेल उद्घाटनासाठी वर्गमित्र थेट ऑस्ट्रेलियाहून भोकरदनमध्ये दाखल

मैत्रीची सातासमुद्रापार झेप! मित्राच्या हॉटेल उद्घाटनासाठी वर्गमित्र थेट ऑस्ट्रेलियाहून भोकरदनमध्ये दाखल

मैत्रीची सातासमुद्रापार झेप! मित्राच्या हॉटेल उद्घाटनासाठी वर्गमित्र थेट ऑस्ट्रेलियाहून भोकरदनमध्ये दाखल

‘हॉटेल वारकरी’च्या भव्य शुभारंभाप्रसंगी उलगडला मैत्रीचा अनोखा बंध
भोकरदन परिसरात नारायण बरोकर आणि संकेतभाऊ खोमने यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा
भोकरदन/प्रतिनिधी/
मैत्री म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही, तर वेळप्रसंगी दिलेला शब्द पाळणे आणि मित्राच्या आनंदासाठी अंतराची तमा न बाळगणे होय, याचाच एक जिवंत प्रत्यय नुकताच भोकरदन शहरात पाहायला मिळाला. निमित्त होते येथील तरुण व्यावसायिक नारायण बरोकर यांच्या **’हॉटेल वारकरी’ (१००% शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट)** या नवीन व्यवसायाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे. या सोहळ्याला ऑस्ट्रेलियाहून आलेल्या एका खास मित्राने हजेरी लावल्याने हा उद्घाटन सोहळा मैत्री, विश्वास आणि जिव्हाळ्याचा एक अविस्मरणीय उत्सव ठरला.
एका फोनवर दिला शब्द पाळला!
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते नारायण बरोकर यांचे वर्गमित्र **संकेत खोमने**. संकेतभाऊ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत. हॉटेलच्या उद्घाटनाचे नियोजन सुरू असताना नारायण यांनी संकेतभाऊंना फोनवरून सहज याविषयी माहिती दिली होती. त्यावेळी कोणताही विचार न करता संकेतभाऊंनी लागलीच शब्द दिला, *”मी नक्की येतो, तुझ्या आनंदात सहभागी होणार!”*
लाखो किलोमीटरचे अंतर, प्रवासाची धावपळ आणि आंतरराष्ट्रीय वेळेचे नियोजन करत संकेतभाऊ खोमने थेट ऑस्ट्रेलियाहून भोकरदनमध्ये दाखल झाले. आपल्या जिवलग मित्रासाठी सातासमुद्रापार करून आलेल्या संकेतभाऊंच्या या कृतीने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments