Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादवेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक...

वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घटना

वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घटना

​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील ३ तोळ्यांचे मणी मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी भरदिवसा हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
​भरदिवसा ‘टी पॉईंट’वर धाडसी चोरी ​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या तिकुंडीगाव येथील रहिवासी पूजा गंगाधर सोनद या आज (शनिवारी) सकाळी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्या मंदिर परिसरातील धर्मशाळा टी पॉईंटजवळ उभ्या होत्या. ​त्याच वेळी एका मोटारसायकलवरून दोन अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच, दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने पूजा सोनद यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र जोरात हिसकावले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला भाविक प्रचंड घाबरली. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे दुचाकीवरून वेगाने फरार झाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments