शेतीच्या वादावरून एकास चाकू हल्ला
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील गंधेश्वर इथे घडले शेतातून जाणे येणे करायचे नाही असे म्हणत एकास तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून चाकू हल्ला केल्याची घटना दि २१ रोजी तालुक्यातील गंधेश्वर रोजी घडली असून या संदर्भात आज शनिवारी तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिनाथ हरीभाऊ काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतातून यापुढे जाणे येणे करायचे नाही म्हणत लक्ष्मण काटकर, भाऊसाहेब काटकर, परमेश्वर काटकर यांनी मारहाण करत पोटावर डाव्या बाजूने कंबरेवर चाकूने हल्ला करत जखमी केले आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीसांनी वरील तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
