Friday, September 25, 2026
Homeऔरंगाबादश्री क्षेत्र वेरूळ येथे भव्य वार्षिक विद्यार्थी संस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ! ​हजारो...

श्री क्षेत्र वेरूळ येथे भव्य वार्षिक विद्यार्थी संस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ! ​हजारो बालकांचा सहभाग; भक्ती आणि संस्कारांचे सिंचन

श्री क्षेत्र वेरूळ येथे भव्य वार्षिक विद्यार्थी संस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण शुभारंभ!
​हजारो बालकांचा सहभाग; भक्ती आणि संस्कारांचे सिंचन

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील क्षेत्र वेरूळ येथे गुरुपौर्णिमेचे पावन औचित्य साधून वार्षिक विद्यार्थी संस्कार शिबिराचा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आणि उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या शिबिराचा मुख्य उद्देश बालगोपाळांवर भक्ती, ज्ञान आणि चांगल्या संस्कारांची शिदोरी रुजवून त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवणे हा आहे.
​शिबिराच्या पूर्वसंध्येला संपूर्ण वेरूळ परिसरात भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. भगवंताच्या नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि पवित्र ध्वजाच्या फडकण्याने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता. हजारो बालके पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते, ज्यामुळे एक वेगळाच भक्तीरस ओसंडून वाहत होता. आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
​या शिबिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो बालकांनी सहभाग नोंदवला आहे. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम, ध्यान, स्तोत्रपठण, महापुरुषांच्या कथा आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून बालकांमध्ये देशप्रेम, गुरुभक्ती आणि समाजाप्रती आपली कर्तव्ये याची जाणीव निर्माण केली जाईल. जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी आपल्या आशीर्वचनात संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आश्रमातील सेवक, स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments