Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादघृष्णेश्वर मंदिरात नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनी घेतले दर्शन; श्रीकांत भालेराव यांच्याकडून सत्कार

घृष्णेश्वर मंदिरात नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनी घेतले दर्शन; श्रीकांत भालेराव यांच्याकडून सत्कार

घृष्णेश्वर मंदिरात नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनी घेतले दर्शन; श्रीकांत भालेराव यांच्याकडून सत्कार

​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सुकन्या आणि महानगरपालिका नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनी भेट देऊन भगवान शंकराचे भावपूर्ण दर्शन घेतले.त्यांच्या या भेटीने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण होते. ​दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी हर्षदा शिरसाट यांचा प्रसाद आणि श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत घृष्णेश्वर देवस्थानाचे विश्वस्त राजेंद्र कोशिके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. ​हर्षदा शिरसाट यांनी मंदिरातील शांत आणि पवित्र वातावरणाचे कौतुक केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते आणि भाविकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या धार्मिक सहभागाचे मंदिर प्रशासन आणि स्थानीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments