Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादपावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर; तात्काळ पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाई...

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर; तात्काळ पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाई द्या :-नितिन जेथलिया यांची मांगणी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर; तात्काळ पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाई द्या :-नितिन जेथलिया यांची मांगणी

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले

परतूर :- परतूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी अत्यल्प पाऊस तसेच मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसाच्या दीर्घ खंडामुळे कापूस, सोयाबीन व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मा. उपविभागीय अधिकारी, परतूर यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना पीकविमा व शासकीय नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
    परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर, मंठा तसेच ग्रामीण भागात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. सुरुवातीला पिकांची उगवण समाधानकारक झाली असली तरी त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. विशेषतः सोयाबीनची पाने वाळत असून झाडांची वाढ खुंटली आहे. शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या काळात पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. कापूस पिकाचीही अवस्था चिंताजनक असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
     शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी व डिझेलसाठी मोठा खर्च केला असून अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतर पीक हातात येण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.नितिन जेठालिया यांनी
     या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत गावनिहाय व शेतनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे पंचनाम्यांमध्ये पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, पिकांचे झालेले नुकसान आणि अपेक्षित उत्पादनातील घट यांची वस्तुनिष्ठ नोंद करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
      ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे, त्यांना नियमानुसार पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनी व यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच पूर्वी अस्तित्वात असलेले पीकविमा नुकसान संदर्भातील ०४ ट्रिगर पुन्हा लागू करून पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments