Thursday, September 24, 2026
Homeऔरंगाबादआपल्या पाल्यांसाठी उन्हाळा सुट्टीतील अमूल्य भेट द्या इंट्युशन प्रोसेस शिबीर

आपल्या पाल्यांसाठी उन्हाळा सुट्टीतील अमूल्य भेट द्या इंट्युशन प्रोसेस शिबीर

आपल्या पाल्यांसाठी उन्हाळा सुट्टीतील अमूल्य भेट द्या इंट्युशन प्रोसेस शिबीर

जालना/प्रतिनिधी/ दि-आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष इंट्युशन प्रोसेस (प्रज्ञा योगा) शिबिराचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे.परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवू शकणारे असे शिबिर 5 ते 18 वयोगटातील मुलांच्या बौद्धिक, मानसिक व अंतर्ज्ञान क्षमतेच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या 11 दिवसीय विशेष शिबिरामध्ये 4 दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण व त्यानंतर 7 दिवस दैनिक ऑनलाईन सरावाचा समावेश आहे. खेळ, सांघिक प्रक्रिया, योग, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढ, योग्य निर्णयक्षमता, स्मरणशक्ती विकास, सर्जनशीलता, तणावमुक्त जीवनशैली तसेच मोबाईल वापर कमी करण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिरासाठी वरिष्ठ प्रशिक्षक श्री देव गोसकी व श्री माऊली दोबोले मार्गदर्शन करणार आहेत.
ऑफलाईन शिबिराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :  Junior (5 ते 8 वर्षे) : दि. 17, 18, 19 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 व दि. 20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 IP Kids (8 ते 13 वर्षे) व IP Teens (13 ते 18 वर्षे) : दि. 17, 18, 19 मे रोजी सायंकाळी 5 ते 9 व दि. 20 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 1
तसेच जालना शहरात प्रथमच इंट्युशन प्रोसेस लेवल 2 कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हा कोर्स IP Seniors, IP Kids व IP Teens पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या अंतर्ज्ञान क्षमतेचा अधिक सखोल विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कोर्समध्ये भविष्यवाणी कौशल्य, टेलीकिनेसिस, भाषांचे आकलन यांसारख्या विशेष कौशल्यांचा सराव घेतला जाणार आहे. हा कोर्स 8 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असून दि. 18 व 19 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
दि. 18 मे रोजी सकाळी 8:30 ते 11:30 व दि. 19 मे रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कोर्स होणार आहे.
हे शिबिर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था सभागृह, टाऊन हॉल कचेरी रोड, जुना जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9637754952, 9665789869 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments