दुष्काळात मायक्रो फायनान्सची हप्ते वसुली तत्काळ थांबवा
जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांचे प्रशासनाला निवेदन
जालना/प्रतिनिधी/ जाफराबाद तालुक्यातदुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक आणिलघुउद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली कर्जाच्या हप्त्यांची वसुली तत्काळथांबवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारेकेली आहे.
शेतकरी, महिला शेतमजूर, दूध उत्पादक तसेच छोटे व्यावसायिक बचत गटांच्यामाध्यमातून मायक्रो फायनान्स संस्थांकडून कर्ज घेतात. या कर्जाची परतफेडदरमहा हप्त्यांच्या स्वरूपात केली जाते. संबंधित संस्थांचे अधिकारीगावोगावी जाऊन हप्त्यांची वसुली करतात. मात्र, सध्याच्या दुष्काळीपरिस्थितीमुळे ठाामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून,कर्जदारांसमोर हप्ते भरण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. पावसाअभावीशेतातील पिके करपून गेल्याने खुरपणी, खतांची फवारणी आणि इतर शेतीकामेठप्प झाली आहेत. परिणामी, शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, आगामी रब्बी हंगामाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने मायक्रो फायनान्सच्या कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज भरणे कर्जदारांसाठी कठीण झाले आहे. हप्ते भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने काही कर्जदारांना पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे, तर काही कुटुंबांना कर्जफेडीसाठी घरातील सोने-नाणे किंवा पशुधन विकण्याची वेळ येण्याची भीती आहे.
कर्जवसुलीला काही कालावधीसाठी स्थगिती द्या- जिल्हाप्रमुख ‘या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने मायक्रो फायनान्स संस्थांच्या कर्जवसुलीला काही कालावधीसाठी स्थगिती द्यावी. तसेच कर्जावरील व्याजात शिथिलता द्यावी, थकीत हप्त्यांवर दंड आकारू नये आणि केवळ हप्ता थकल्यामुळे कर्जदारांच्या सिबिल (ण्घ्ँघ्थ्) स्कोअरवर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठाामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा,अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनिषश्रीवास्तव यांनी केली आहे.
