मत्स्योदरी देवीच्या यात्रेनिमीत्त आय.टी.आय. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न
अंबड/प्रतिनिधी/ संपूर्ण मराठवाड्याच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री. मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवा दरम्यान भाविकांच्या दर्शन रांगासह इतर विविध कामांचे नियोजन करण्यासाठी येथील महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे विशेष सेवा योजना शिबिर घटस्थापनेपासून सुरू झाले आहे.
यामुळे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होत आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 2026 घटस्थापनेपासून या राष्ट्रीय सेवा योजनेचे च्या विशेष शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे. मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात गाभाऱ्यास संपूर्ण परिसरातील दर्शन रांगा सुरळीत करणे, विशेष दर्शन रांगा, मुलांचे नवस फेडणे अशा विविध ठिकाणी विद्यार्थी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे. भाविक आल्यापासून तर दर्शन करून बाहेर पडेपर्यंत आय.टी.आय. मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) चे स्वयंसेवक स्वइच्छेने, हिरारीने सकाळी 6 पासून सायंकाळी 9 वाजेपर्यंत मदत करत आहेत.
सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी वकृत्व स्पर्धा , काव्यवाचन स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, तसेच बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर या दोन दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तत्कालीन शिल्प निदेशक तथा माजी प्राचार्य देविदास राठोड यांनी 2005 पासून सुरू केलेल्या या विशेष शिबिराची परंपरा आजतागायत आय. टी. आय. अंबड चे NSS चे विद्यार्थी आनंदाने पुढे चालवत आहेत, अशी माहिती NSS चे कार्यक्रमाधिकारी प्रा. संतोष दहयाळकर यांनी दिली. या प्रसंगी स्वच्छता सप्ताह अंतर्गत NSS च्या स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यासाठी हिरारीने सहभाग घेऊन सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत केली. तसेच विशेष दर्शन पास आणि नवसाचे नारळ फोडण्यासाठी पास च्या माध्यमातून संस्थानला आर्थिक महसूल गोळा करून दिला.
या शिबिरास आमदार नारायण कुचे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष सोमेश मोहिते, माजी सभापती प्रकाशतात्या बोरडे, माजी प्राचार्य भागवत कटारे, प्राचार्य बालाजी लाहोरकर, माजी उपनगराध्यक्ष कैलास भोरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गोवर्धन भोरे, गटनिदेशक एस.एल. तोडकर, गटनिदेशक काकासाहेब गाडेकर, आर.जी.थोरे, आदींनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले.
या विद्यार्थी स्वयंसेवकांसाठी SRJ कंपनी च्या वतीने ट्रॅक सूटची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक सहसंचालक अतुल केसकर, संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांच्या हस्ते शिबीराचा शुभारंभ व ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी सहाय्यक सहसंचालक तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, संस्थेचे प्रभारी प्राचार्य एल. व्ही. पुपले, प्रभारी गटनिदेशक एस. ए. भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी संतोष दहयाळकर, माजी सैनिक एन. बी. चौधरी, सतिश भालगावकर, दत्ताभाऊ चौधरी, अजय बुंदेलखंडे, योगेश आठवले, बाबासाहेब खरात हे कर्मचारी स्वयंसेवकासोबत शिबीर यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत.