कुलपती अंकुशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगीतिक सोहळ्याचे आयोजन
एमजीएममध्ये ‘अत्थाय हिताय लोकानुकम्पाय’ सांगीतिक अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर :- शील-समाधी-प्रज्ञेच्या ध्यासाने प्रेरित होऊन समस्त लोकांच्या उत्तम-मंगलासाठी कुशल कर्माचे संपादन करणारे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगीतिक अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन एमजीएम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त महाकवी वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतांची सांगीतिक प्रस्तुती प्रोफेसर संजय मोहड, विद्यार्थीनी वृंद आणि सहकारी कलावंत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांना खुला प्रवेश असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
