Homeऔरंगाबादखुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात

खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात

खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात

​वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा पुढाकार; स्वतः रक्तदान करून केले जनजागरण
​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कांचन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुधखेडकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना रक्तादानाची प्रेरणा मिळाली असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
​या शिबिरासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे संकलन अधिकारी डॉ. शामल गरड व त्यांच्या टीमने तांत्रिक सहकार्य पुरवले. शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे, इन्चार्ज अधिपरिचारिका श्रीमती ज्योती दारवंटे यांच्यासह रुग्णालयातील सर्व परिचारिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गरजू व आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात दातृत्वाची भावना रुजावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments