Homeऔरंगाबादजालना येथे चर्मकार समाजाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन

जालना येथे चर्मकार समाजाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन

जालना येथे चर्मकार समाजाच्या वतीने मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन

जालना/प्रतिनिधी/ मान्यवर कांशीराम साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहरात चर्मकार समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता राहुल सत्यनारायण करनाडे यांनी कांशीराम साहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची माहिती उपस्थितांना दिली.बहुजन समाजाला संघटित करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी करण्यात कांशीराम साहेब यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सामाजिक समता, स्वाभिमान, राजकीय प्रतिनिधित्व आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते, असे करनाडे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, संघटन आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याच्या विचारांचा अंगीकार करून समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी, सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणे ही श्रद्धेची बाब असली, तरी त्यांच्या विचारांचे आचरण करणे हाच खरा आदर आहे, असे मत राहुल करनाडे यांनी व्यक्त केले.
जालना जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण, रोजगार आणि वंचित घटकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. चर्मकार समाजातील गटई कामगारांना सन्मानाने व्यवसाय करता यावा, त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे आणि तरुणांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी समाजाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजातील सर्व घटकांनी जातिभेद, अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी संविधानिक मार्गाने पुढाकार घ्यावा. महापुरुषांचे विचार केवळ जयंती व पुण्यतिथीपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक एकता, जनहित आणि प्रत्यक्ष कृतीतून पुढे न्यावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.या प्रसंगी फकिरा रामदास बिरसोने, गोपीचंद अंकुश चंद्रे, कुंदन हंसराज कुटील, रमेश लक्ष्मण भगुरे, रोहिदास आसाराम आकसे, शिवलाल जीवनलाल वैरी आणि बाबुराव शेळके सर उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments