Homeऔरंगाबाददुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत घ्यावी - प्राचार्य डॉ. मोहन खताळ...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत घ्यावी – प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांचे आवाहन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत घ्यावी – प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांचे आवाहन

देगलूर/प्रतिनिधी/  महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, सर्व विद्यापीठांच्या परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा करुण त्याविषयी परिपत्रक जारी केले आहे. “शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असून, दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणीही विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नये,” असे आवाहन अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर व सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार यांनी केले आहे. या महत्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच आपले परीक्षा शुल्क महाविद्यालयात भरले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात येत असल्याची माहिती देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी आवाहन
      प्राचार्य डॉ. खताळ सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या हिवाळी २०२६ परीक्षेसाठी पदवी व पदव्युतर परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनी परीक्षा शुल्क भरल्याची पावती सोबत आणावी व महाविद्यालयातून शुल्क परत घ्यावी असे आवाहन केले आहे. प्रस्तुत आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क परत घेण्यासाठी महाविद्यालयात गर्दी केलेली असून शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा शुल्क परत घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments