Tuesday, June 30, 2026
Homeऔरंगाबादधारदार तलवार,खंजीर व कट्यार बाळगणारा आरोपी जेरबंद

धारदार तलवार,खंजीर व कट्यार बाळगणारा आरोपी जेरबंद

धारदार तलवार,खंजीर व कट्यार बाळगणारा आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची अंबड येथे धडक कारवाई
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अंबड येथील एका युवकाला अटक केली आहे.आरोपीच्या ताब्यातून एक धारदार तलवार,एक खंजीर आणि एक धारदार कट्यार असा सुमारे ₹4 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. तेघबीर सिंह संधू यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबड येथील मंथन संजय उपाध्याय (वय 20,रा.अशोकनगर, अंबड) याच्या घरावर छापा टाकला.यावेळी त्याच्याकडून एक धारदार व तीक्ष्ण तलवार, एक खंजीर आणि एक धारदार कट्यार जप्त करण्यात आली.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.तेघबीर सिंह संधू,अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉॅ.सिंद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ,पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments