Homeऔरंगाबादश्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या हौद बांधकामासाठी सचिन पठाडे यांची ५० हजारांची देणगी

श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या हौद बांधकामासाठी सचिन पठाडे यांची ५० हजारांची देणगी

श्री मत्स्योदरी देवी संस्थानच्या हौद बांधकामासाठी सचिन पठाडे यांची ५० हजारांची देणगी
अक्षरदीप ऑफसेटचे श्री.सचिन पठाडे यांचा सामाजिक बांधिलकीतून पुढाकार; संस्थानच्या वतीने देवीचा फोटो व श्रीफळ देऊन सन्मान
अंबड/प्रतिनिधी/ अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी संस्थान परिसरातील तडे गेलेल्या हौदाच्या दुरुस्ती व पुनर्बांधकामासाठी अक्षरदीप ऑफसेट, अंबडचे संचालक श्री. सचिन चंद्रकांत पठाडे यांनी ५० हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी ही देणगी संस्थानकडे सुपूर्द केली.
       श्री मत्स्योदरी देवी संस्थान परिसरातील हौदाला तडे गेल्याने त्याच्या दुरुस्ती व नव्याने बांधकामाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या कामासाठी श्री. सचिन पठाडे यांनी पुढाकार घेत ५०,००० रुपये (अक्षरी पन्नास हजार रुपये) देणगी दिली. त्यांच्या या योगदानामुळे संस्थानच्या हौद बांधकामासाठी मोलाची मदत होणार आहे.
        यावेळी देणगी स्वीकारताना संस्थानचे व्यवस्थापक श्री. कैलास शिंदे यांनी श्री. सचिन पठाडे यांना श्री मत्स्योदरी देवीचा फोटो व श्रीफळ देऊन सन्मानित केले.या प्रसंगी संस्थानचे कर्मचारी नामदेव राठोड, गोविंद कायस्थ आणि जाधव मामा उपस्थित होते. धार्मिक स्थळाच्या विकासासाठी देणगी देत श्री. सचिन पठाडे यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments