Homeऔरंगाबादश्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आता जालना महानगरपालिकेच्या ताब्यात

श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आता जालना महानगरपालिकेच्या ताब्यात

श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आता जालना महानगरपालिकेच्या ताब्यात

 

 

जनसंघ स्थापना दिनानिमित्त भाजपाची भव्य रॅली व जाहीर सभा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रासाठीचे योगदान आजही मार्गदर्शक-रावसाहेब पाटील दानवे

जनसंघाच्या विचारधारेच्या बळावर भाजपाने देशभरात संघटन मजबूत केले- आ.बबनराव लोणीकर

जालन्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्मारकाचा इतिहासात आवर्जून उल्लेख होईल – भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे

जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, जालना महानगरच्या वतीने बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जालना शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. वीर सावरकर चौक येथून फुलंब्रीकर नाट्यगृहापर्यंत काढण्यात आलेली ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली रॅलीच्या समारोपानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “एक देश में दो प्रधान, दो निशान और दो विधान नहीं चलेंगे” या त्यांच्या ऐतिहासिक घोषणेचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांना उजाळा देण्यात आला.

       डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाची जागा मागील अनेक वर्षांपासून वादात अडकली होती. अखेर ही जागा जालना शहर महानगरपालिकेच्या ताब्यात आल्याने उद्यानाच्या उर्वरित रखडलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या परिसराचा विकास होण्यास गती मिळणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

      यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ. बबनरावजी लोणीकर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. नारायण कुचे, माजी आ.कैलास गोरंट्याल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, राहुल भैया लोणीकर,  मराठवाडा संयोजक नितीन काळे, किरण पाटील, भाजप मराठवाडा कार्यालय प्रमुख धनंजय कुलकर्णी, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, भाजपा सरचिटणीस सुनील पवार, संगीताताई गोरंट्याल यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

      यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आणि जनसंघाच्या माध्यमातून मांडलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्याच विचारांच्या आधारावर भारतीय जनता पार्टीने देशभरात संघटन उभे केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीसाठी काम सुरू आहे.

      यावेळी माजी मंत्री आ. बबनरावजी लोणीकर म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी रुजवलेल्या विचारधारेच्या बळावर भारतीय जनता पार्टीने देशभरात संघटन मजबूत केले आहे. भारतीय जनसंघाचा ७५ वर्षांचा हा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे

       प्रदेश सरचिटणीस सुनील राणे म्हणाले की, भविष्यात जेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा जालन्यातील त्यांच्या स्मारकाचा उल्लेख आवर्जून केला जाईल. जालन्यातील हे स्मारक त्यांच्या विचारांची आणि राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देणारे ठरेल.

       यावेळी नगरसेवक वीरेंद्र धोका यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाची जागा जालना महानगरपालिकेच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे उद्यानाच्या विकासकामांना मार्ग मोकळा झाल्याने उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments