कचनेर येथे भगवान श्री चिंतामणी पार्श्वनाथांचा महामस्तकाभिषेक उत्साहात
छत्रपती सभाजीनगर :- श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ठोले परीवाराचा वतीने सकाळी श्री 1008 चिंतामणि पार्श्वनाथ भगवंतांना 1008 नारळ अर्पण करून सामूहिक पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली.
यानंतर बोलीचा कार्यक्रम पार पडला. इंद्र-इंद्राणींच्या हस्ते भगवान श्री चिंतामणी पार्श्वनाथांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्राणी व शांतीधारेचा मान लासूर स्टेशन येथील सुभाषचंद आशिषकुमार रियांशकुमार ठोळे परिवाराला मिळाला. दुध अभिषेक सौ रिंकु भुषणकुमार कासलीवाल
मिळाला. अभिषेक सोहळ्यानंतर सुभाषचंद आशीषकुमार रियांशकुमार, सौ शोभाबाई सुभाष ठोले ,सौ नूतन आशिषकुमार ठोले ,कु रिशु ,चि रियांश ठोळे परिवार लासूर वाले याचा वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
धार्मिक कार्यक्रमाला चादवडचे नगराध्यक्ष भुषणकुमार जयचद कासलीवाल याचासह समाजबाधव कचनेर विश्वस्त मडळ व कार्यकारीनी मडळ उपस्थिती होती.