Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादजालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन

जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन

जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन

जालना/प्रतिनिधी/ आपल्या कुंचल्यातून सामाजिक वास्तव, मानवी संवेदना

आणि साहित्यिक आशयाला प्रभावी दृश्यरूप देणारे जालन्याचे ज्येष्ठ आणि प्रख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने जालना शहरासह महाराष्ट्राच्या कला आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

श्रीधर अंभोरे हे केवळ चित्रकार नव्हते, तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषांमधून साहित्याला दृश्यभाषा देणारे कलावंत म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. महाराष्ट्रातील अनेक लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या पुस्तकांना त्यांनी आपल्या कलात्मक मुखपृष्ठांमधून वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या चित्रांमध्ये केवळ सौंदर्य नव्हे, तर आशयसंवेदनासामाजिक भान आणि मानवी जीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे उमटत असत.

श्रीधर रेषांची स्वतंत्र ओळख

अंभोरे यांच्या चित्रशैलीतील रेषांना स्वतंत्र ओळख प्राप्त झाली होती. अत्यंत मोजक्या आणि नेमक्या रेषांमधून एखादा विचार, प्रसंग किंवा भावना व्यक्त करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. त्यांच्या कलाकृतींनी जालना तसेच महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रात आपला ठसा उमटविला.

अनेक लेखक-कवींच्या साहित्यकृतींना त्यांच्या मुखपृष्ठांच्या माध्यमातून मिळालेली दृश्य ओळख आजही त्यांच्या कलाप्रवासाची साक्ष देणारी आहे. त्यांच्या निधनामुळे या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना कला-साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

श्रीधर अंभोरे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले लेखक, कवी, चित्रकार, साहित्यिक, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत त्यांच्या कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. रवींद्र इंगळेसुरेश साबळेदासू वैद्यउत्तम अंभोरेअशोक इंगळेमनोज पाठकरवींद्र सातपुतेअशोक कोतवालशेषराव धांडेराजेंद्र राख आणि राजेश राऊत यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

दूरध्वनीवरून शोकसंदेश

अंभोरे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील विविध भागांतील साहित्यिक आणि कलावंतांनी दूरध्वनीद्वारे शोक व्यक्त केला. रामदास फुटाणेश्रीकांत देशमुखयशवंत मनोहरसुमती लांडेसतीश बडवेदागोकाळेचित्रकार मापरसावळे आणि धनंजय गोवर्धन आदींचे शोकसंदेश पंडित तडेगावकर यांनी शोकसभेत वाचून दाखविले.

कलासाहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

शोकसभेस शशिकांत शिंदेसंदीप काळेनंदकिशोर आढावसतीश डेरेकरदिलीप खोटेमिलिंद बागुलसत्यजित साळवेसुधाकर कुराडेबापू पानपाटीलरवींद्र साळवेदिलीप सपकाळेअनिल कांबळेमहेंद्र ताजनेबबन महामुनेडॉसंजीवनी तडेगावकरसुहास पोतदारप्रभाकर शेळकेनारायण पाझाडेशांतीलाल बनसोडेप्राचार्य सोलाटराम कदमराम गायकवाडविजय कुमठेकररावसाहेब ढवळेजगत घुगेयशवंत सोनुनेराम सावंतनारायण बोराडेविनोद जैतमहालशिवाजी मदनबाबू श्रीरामेजिजा वाघपंडित रानमाळकैलास भालेसंतोष लव्हटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आता कोरा कागद… रेषा मागेल कुणाला?

श्रीधर अंभोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुंचल्यातून साकार होणाऱ्या त्या वैशिष्ट्यपूर्ण श्रीधर रेषा’ आता थांबल्या आहेत. साहित्यिकांच्या शब्दांना मुखपृष्ठावर दृश्यरूप देणारा, मोजक्या रेषांमधून मोठा आशय व्यक्त करणारा एक संवेदनशील कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कलाकृती आणि कला- साहित्य क्षेत्रातील योगदानाच्या रूपाने त्यांची स्मृती मात्र कायम जिवंत राहणार आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments