Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादघनसावंगी येथे शिवसेना संवाद बैठकीत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचा सत्कार

घनसावंगी येथे शिवसेना संवाद बैठकीत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचा सत्कार

घनसावंगी येथे शिवसेना संवाद बैठकीत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचा सत्कार

घनसावंगी/प्रतिनिधी/ राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा शिवसेना संपर्कमंत्री आशिष जैस्वाल हे शिवसेना संवाद बैठकीनिमित्त घनसावंगी येथे आले असता त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार हिकमत उढाण, शिवसेना विभागप्रमुख विष्णुपंत कोरडे, युवानेते अमित मुळे, शुभम कोरडे तसेच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संवाद बैठकीत पक्ष संघटन मजबुती, जनसामान्यांचे प्रश्न, विकासकामे तसेच आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना पक्ष बळकटीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments