Homeऔरंगाबाद5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हााधिकारी आशिमा मित्तल यांनी केली...

5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हााधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मतदान केंद्र आणि सुरक्षा कक्षाची पाहणी

5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हााधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मतदान केंद्र आणि सुरक्षा कक्षाची पाहणी

जालना :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघातील जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याअनुषंगाने 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 ते 04.00 या वेळेत जालना जिल्ह्यातील 89 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग आला आहे.

     त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 यांनी जालना शहरातील मतदान केंद्र क्रमांक 232, जिल्हा औद्योगिक व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय खोली क्रमांक 01 मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक तेगबीर सिंग सिंधू, उप विभागीय अधिकारी रामदास दौंड, जालना महानगर पालीका उप आयुक्त श्रीमती गायकवाड, तहसिलदार, निवडणूक विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाधिकारी मित्त्ल यांनी मतदान केंद्रावरील पिण्याचे पाणी, वीज,शौचालय, बैठक व्यवस्था, दिव्यांग मतदारासाठी रॅम्प, तसेच सोयी-सुविधा याबाबत पाहणी केली. तसेच सर्व मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असाव्यात आणि मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     तसेच बदनापूर तालूक्यातील शेलगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 247, जिल्हा व परिषद प्रशाला खोली क्रमांक 1 व बदनापूर येथील 242, जिल्हा परिषद प्रशाला नवी इमारत, खोली क्रमांक 1 बदनापूर व मतदान केंद्र क्र. 243, जिल्हा परिषद प्रशाला नवी इमारत, खोली क्रमांक 2 बदनापूरची पाहणी केली. तसेच बदनापूर येथील उप कोषागार कार्यालयातील सुरक्षा कक्षाची जिल्हाधिकारी मित्त्ल यांनी पाहणी केली. यावेळी परिविक्षाधिन उप विभागीय अधिकारी श्रीमती बागुल, तहसिलदार श्री. हंदेश्वर, नायब तहसिलदार श्री .बने, बदनापुर नगर पंचायत मुख्याधिकारी विशाल पाटील, मंडळ अधिकारी श्रीमती मरमट यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

      मतदान केंद्रातील फॅन, लाईट, स्वच्छतागृह, दिव्यांग मतदारासाठी रॅम्प, तसेच सुरक्षा व्यमवस्थाक इत्यादीबाबत आढावा घेतला. बदनापूर येथील उप कोषागार कार्यालयातील सुरक्षाकक्षाची पाहणी दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वीत करणेबाबत जिल्हाधिकारी मित्त्ल यांनी निर्देश दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments