वसुसायगाव शिवरात जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
पाच आरोपींवर गुन्हा दाखल, एक लाख एकुणसत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वसुसायगाव शिवार येथे दि, १७/८/२०२६ रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीर रित्या जुगार पत्त्यांवर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या कडून मिळाल्यानंतर शिल्लेगाव पोलिसांनी कारवाई केली.सदर कारवाईमध्ये ताब्यात घेणारे ५ इसम जुगार खेळताना मिळून आले—सुभाष शेकनाथ कु-हाडे, वय ५१ वर्षे, रा. रांजणगाव पोळ, ता. गंगापूर.देवसिंग हिरालाल महेर, वय ४५ वर्षे, रा. एकभुर्जी वाघलगाव, ता. गंगापूर.विठ्ठल उत्तम बिघोत, वय ५३ वर्षे, रा. एकभुर्जी वाघलगाव, ता. गंगापूर.सिराज शेख पटेल शेख, वय २५ वर्षे, रा. वसुसायगाव, ता. गंगापूर.शांताराम तात्याबा शेजवळ, वय ५३ वर्षे, रा. वसुसायगाव, ता. गंगापूर.सदर आरोपींकडून रोख रक्कमसह ४ दुचाकी वाहने तसेच पत्त्यांचा संच, असा एकूण ऐवज एक लाख एकुणसत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३९५/२०२६, कलम १२(a), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाईशिल्लेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे पोलीस अंमलदार दाणी, रवी दाभाडे, अर्जुन तायडे यांनी केली