Thursday, June 25, 2026
Homeऔरंगाबादत्याग आणि देशभक्तीची मूर्तीमंत उदाहरण दामोदर हरी चाफेकर : डॉ. भगवान जायभाये

त्याग आणि देशभक्तीची मूर्तीमंत उदाहरण दामोदर हरी चाफेकर : डॉ. भगवान जायभाये

त्याग आणि देशभक्तीची मूर्तीमंत उदाहरण दामोदर हरी चाफेकर : डॉ. भगवान जायभाये
पाचोड/प्रतिनिधी/ श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित शिवछत्रपती महाविद्यालय,पाचोड येथे क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भगवान जायभाये यांनी “दामोदर हरी चाफेकर हे त्याग, शौर्य आणि देशभक्तीची मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमधून राष्ट्रनिर्मितीचा मार्ग उजळतो,” असे प्रतिपादन केले.महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश नलावडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. जायभाये म्हणाले की,भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये दामोदर हरी चाफेकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. इंग्रजांच्या अन्यायकारक आणि दडपशाहीच्या राजवटीविरुद्ध त्यांनी निर्भयपणे आवाज उठविला.देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनचरित्रातून मिळते. आजच्या युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाज आणि राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. चाफेकर बंधूंच्या बलिदानातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे धडे घ्यावेत. क्रांतिकारकांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेश नलावडे यांनी सांगितले की, देशभक्ती, त्याग आणि शिक्षण ही प्रगतीची त्रिसूत्री आहे. राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे. क्रांतिकारकांचे जीवनचरित्र हे युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यातून राष्ट्रप्रेमाची निष्ठा दृढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत देशसेवेची प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.”क्रांतीची प्रेरणा, शिक्षणाची दिशा आणि राष्ट्रसेवेची निष्ठा” हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्राध्यापक सचिन कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.उत्तम जाधव यांनी केले याप्रसंगी  डॉ. सुरेश नलावडे यांनी चाफेकर बंधूंच्या जीवन कार्यावर भाष्य केले.कार्यक्रमास डॉ. संतोष चव्हाण, ग्रंथपाल डॉ. हरिप्रसाद बिडवे,डॉ.सुभाष पोटभरे, डॉ.विलास महाजन,डॉ.हेमंत कुमार जैन, डॉ.संदीप सातोनकर,डॉ.विठ्ठल देखणे ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments