स्वराज्य मिलिटरी स्कूल अँड अकॅडमीच्या इयत्ता ८ वीच्या १४ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील स्वराज्य मिलिटरी स्कूल अँड अकॅडमीच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शाळेतील एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले विद्यार्थी सोहम घुले, साईराज शिंदे, परिणीती बोडखे, स्नेहल जाधव, कृष्णा मोरे, तनुजा मोरे, मयंक पुसे, अभिनव हराळे, सानिका शेळके, अंशुमान देवकर, स्मृती पाथ्रीकर, प्रतिज्ञा बोडखे, ऋतिका बोडखे, ओम मोरे विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे परीक्षा विभाग प्रमुख प्रेम जाधव यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, विषय शिक्षकांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांंच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमेश निकम, सचिव वैशाली चव्हाण, संचालक डॉ. आदिनाथ वाकळे, प्राचार्य डॉ. एम. के. अलेक्स, उपप्राचार्य अविनाश थिटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
