Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादसंजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन गिधाड करावे भाजपा प्रदेश...

संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन गिधाड करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन गिधाड करावे

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

      जनाब संजय राऊत यांच्या कारवायांना ऑपरेशन गिधाड हाच शब्द योग्य आहे. कारण त्यांची प्रवृत्तीच गिधाडाची आहे. गिधाड जसे दुसऱ्याच्या मरणावर टपलेले असते तसे तुम्ही दुसऱ्याच्या वाईटावर टपलेले आहात. म्हणून तुमचेच ऑपरेशन गिधाड करत महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला मरणासन्न अवस्थेत पोहोचवले आहे. महाराष्ट्राची वाट लावण्यात तुमचा क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे ऑपरेशन टायगरची भाषा करण्यापेक्षा तुम्ही ऑपरेशन गिधाडकडे लक्ष द्या, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात अडीच वर्षे उद्धव ठाकरेंचे सरकार होते तेव्हा त्यांनी घरात बसून फेसबुक लाईव्ह कारभार चालवला. आता त्यांच्या खासदारांनीही त्यांना त्याच भाषेत उत्तर देत व्हर्च्युअलीच उपस्थित राहून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला अक्षरशः ठेंगा दाखवलेला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना भविष्यात जनताही व्हर्च्युअली मतदान करेल आणि व्हर्च्युअलीच त्यांना घरी बसवेल, हीच त्यांची पात्रता आहे. महाराष्ट्र आभासी पद्धतीने, फेसबुक लाईव्हवर चालत नाही. महाराष्ट्र मातीत, घामात आहे आणि मेहनत, कष्टात आहे. घरात बसून व्हर्च्युअलीच कारभार करायचा एवढाच त्यांचा धंदा झाल्याने येत्या काळात हे खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाहीत, असे श्री. बन यांनी सुनावले.

दोन देशांमध्ये परस्पर चांगले संबंध राहिले तर त्याचा फायदा दोन्ही देशाला होतो, हे मोहनजी भागवत यांचे वक्तव्य अतिशय योग्य असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, पाकिस्तान हा आपल्या शेजारचा देश आहे. अशा देशाशी चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. त्यावर संजय राऊतांनी टीका करण्यास मूर्खपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. तुम्ही स्वतः पाकिस्तान धार्जिणे आहात. पाकिस्तानचे प्रवक्ते होण्याचे काम संजय राऊत यांनी  याआधीही अनेकदा केले. ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले. पण पाकिस्तानचा कितीही उदो उदो केला तरीही या देशातील जनतेला त्याचा फरक पडणार नाही. तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते व्हा, नाहीतर आणखी कुठल्या देशाचे प्रवक्ते व्हा. या देशातील जनता ही भाजपासोबत आणि पाकिस्तानच्या विरोधात आहे. तुम्ही कितीही वायफळ बडबड करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला धडा शिकवण्याचे काम या देशातल्या जनतेने वेळोवेळी केले.

गोविंद येतयेकर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments